MS Dhoni : धोनी आयपीएलमधून घेणार निवृत्ती ? फेसबुक पोस्टवरुन चर्चेला उधाण | पुढारी

MS Dhoni : धोनी आयपीएलमधून घेणार निवृत्ती ? फेसबुक पोस्टवरुन चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सोशल मीडिया अधीक सक्रीय असलेला दिसून येत नाही. पण त्याने त्याच्या फेसबुक पेजवर एक अशी पोस्ट टाकली आहे. ज्यामुळे सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्याने टाकलेल्या पोस्ट मधून तो आयपीएल मधून निवृत्ती घेणार असल्याचा अर्थ काढला जात आहे. तर या सर्वांबाबत खुलासा तो २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे करण्याची शक्यता आहे.

धोनीने फेसबुकवर केलेल्या या पोस्टमुळे असा अंदाज लावला जात आहे की, इंडियन प्रिमियर लीगमधून सन्यास घेण्याची घोषणा करेल. याआधी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या फेसबुक पोस्टवरून ही शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काळात हा दिग्गज खेळाडू आता मैदानात दिसणार नाही. (MS Dhoni)

महेंद्र सिंह धोनी

२०२३ मध्ये देखील सीएसकेकडून खेळणार सांगितलेले होते

आयपीएलमधील मोठ्या टीमपैकी एक चेन्नई सुपर किंग्ज धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा चॅम्पियन ठरला आहे. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये संघाची कामगिरी काही खास नव्हती. या हंगामाच्या सुरुवातीला धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. मात्र संघाच्या सततच्या पराभवामुळे त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. तसेच, या हंगामातील शेवटच्या सामन्यानंतर धोनीने सांगितले होते की तो आयपीएल 2023 मध्येही सीएसकेकडून खेळणार आहे.

होमग्राऊंडवर खेळण्याची संधी आहे, पण…

आयपीएल 2023 मध्ये नियमांमध्ये झालेल्या नियमांनूसार टीमच्या होमग्राऊंडवरच काही सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत धोनी सीएसकेच्या होमग्राऊंडवर खेळून निवृत्तीची घोषणा करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याने चेन्नईमध्ये शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला होता. यानंतर आयपीएल २०२० चे सर्व सामने यूएईमध्ये खेळवलेले होते. 2021 च्या हंगामातील पहिल्या भागात फक्त मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी खेळवले गेले, तर स्पर्धेचा दुसरा भाग UAE मध्ये झाला होता.

त्यामुळे आता धोनी २०२३ चा आयपीएल हंगाम सीएसकेच्या होमग्राऊंडवर त्यांच्या स्थानिक चाहत्यांसमोर योलो जर्सीमध्ये खेळणार का हे पहावे लागेल.

हेही वाचा

Back to top button