ICC T2O World Cup : ‘हा’ देश जिंकणार टी-२० विश्वचषक; सबा करीम यांचे धक्कादायक विधान | पुढारी

ICC T2O World Cup : 'हा' देश जिंकणार टी-२० विश्वचषक; सबा करीम यांचे धक्कादायक विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचे माजी निवड समिती सदस्य सबा करिम यांनी धक्कादायक विधान केले आहे. करिम यांनी टी-२० विश्वचषक कोणता संघ जिंकणार? याबाबत भविष्यवाणी केली आहे. सबा करिम यावेळी बोलताना म्हणाले की, या वर्षीचा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकेल. ऑस्ट्रेलियाच्या संघ मजबूत आणि संतूलन असलेला आहे. त्यामुळे हा संघ विश्वचषक आपल्या नावावर करू शकेल. (ICC T2O World Cup)

२०२१ चा टी-२० विश्वचषकही ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. सबा करिम पुढे बोलताना म्हणाले की, ऑस्ट्रेलियाकडे असे फलंदाज आहेत जे सामना कधीही पलटू शकतात, तसेच त्यांना मोठ्या मैदानावर खेळण्याचा जास्त अनुभव आहे. २०२१ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक आपल्या नावावर केला होता. (ICC T2O World Cup)

यावर्षी २२ ऑक्टोंबरला विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ स्टेजला सिडनीत सुरूवात होणार आहे. न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना रंगणार आहे. तर भारत विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. भारत वि. पाक हा सामना २३ ऑक्टोंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. (ICC T2O World Cup)

हेही वाचलंत का?

Back to top button