पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणार्‍यांना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणार्‍यांना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एनआयए आणि एटीएसने केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयने ठिकठिकाणी निदर्शने केली. पुण्यात केलेल्या निदर्शनांच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र हे व्हिडीओ बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे पोलिसांनी पुण्यात अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

मात्र, महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे जिथे असतील तेथून त्यांना शोधून काढू असा सज्जड इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचलंत का?

Back to top button