Neymar Jr. : नेमार ज्युनिअर मोडणार महान फुटबॉलपटू पेले यांचा 'हा' विक्रम | पुढारी

Neymar Jr. : नेमार ज्युनिअर मोडणार महान फुटबॉलपटू पेले यांचा 'हा' विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पॅरिस सेंट जर्मन आणि ब्राझील संघाचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर सध्या महान फुटबॉलपटू पेले यांचा देशासाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यापासून आता फक्त ३ गोलने मागे आहे. पेले यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये देशाकडून खेळताना ९२ सामन्यात ७७ गोल केले होते. नेमारने आत्तापर्यंत देशाकडून खेळताना ११४ सामन्यांत ७४ गोल केले आहेत. पेले यांचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी नेमारला फक्त ३ गोलची आवश्यकता आहे. (Neymar Jr.)

74 गोलांसह नेमार ज्युनिअर ब्राझीलसाठी पेलेच्या 77 गोलपेक्षा फक्त तीन गोलांनी मागे आहे. गेल्या फिफा विश्वचषकानंतरच्या कालावधीत ब्राझीलचा हा फॉरवर्ड परिपक्व झाला आहे. ब्राझीलसाठी ही चांगली बातमी आहे. नेमार पॅरिस सेंट-जर्मेनसाठी चांगली खेळी करत संघाच्या विजयामध्ये योगदान देत आहे.

देशासाठी गोल नोंदवण्याच्या यादीत रोनाल्डो ‘अव्वल’

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो देशासाठी गोल नोंदवण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने पोर्तुगालसाठी ११७ गोल नोंदवले आहेत. त्याच्या पाठोपाठ इराणचा खेळाडू अली दाई आहे. त्याने आपल्या संघासाठी  १०९ गोल केले आहेत. या यादीच्या भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू सुनील छेत्रीदेखील या यादीमध्ये आहे. छेत्रीने भारतासाठी ८९ गोल केले आहेत.

त्यानंतर अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आहे. त्याने आपल्या देशासाठी  ८६ गोल नोंदवले आहेत. मेस्सीनंतर या यादीमध्ये नंबर येतो, ब्राझीलचे महान फुटबॉलरपटू पेले यांचा नंबर येतो त्यांनी ब्राझीलसाठी ७७ गोल केले आहेत. त्यांचा हा विक्रम मोडण्यासाठी नेमारला आणखी ३ गोल करावे लागणार आहेत. नेमारने आपल्या देशासाठी  ७४ गोल नोंदवले आहेत.

हेही वाचा;

Back to top button