हिंगोली : गोरेगाव येथील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका; केंद्रीय मंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे | पुढारी

हिंगोली : गोरेगाव येथील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका; केंद्रीय मंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दि 16 पासून अपर तहसीलदार कार्यालयासमोर अतिवृष्टीच्या अनुदानातून डावलल्याने बेमुदत संप पुकारला आहे. याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री शंतनु ठाकुर यांना हिंगोली येथे काळे झेंडे दाखवून नोंदवला जाणार आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

जुलै ऑगस्ट दरम्यान मोठी प्रमाणात अतिवृष्टी झाली. या नुकसानभरपाईच्या यादीतून डावलल्याने सेनगाव तालुक्यातील गोरेगावातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शासनाने या संपाची दखल घेतली नसल्याचा निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री शंतनु ठाकुर यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यादरम्यान हा निषेध करणार असल्याचे निवेदन गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा

Back to top button