ENGvsPAK : मोहम्मद रिझावनने टी२० मध्ये 'या' विक्रमाला गवसणी घालत विराट आणि बाबरला टाकले मागे | पुढारी

ENGvsPAK : मोहम्मद रिझावनने टी२० मध्ये 'या' विक्रमाला गवसणी घालत विराट आणि बाबरला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची मालिका सुरू असताना इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान येथे सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझावान आणि बाबर आझम यांनी चांगली फलंदाजी करत संघासाठी ८५ धावांची सलामी दिली. (ENGvsPAK)

या सामन्या दरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझावनने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावांचा टप्पा पार करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम आपल्या नावावर कोरताना त्याने भारताचा रणमशिन कोहली आणि त्याचा साथीदार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला देखील पाठीमागे सोडले आहे. बाबर आझमने देखील विराट कोहलीला मागे टाकत या विक्रमाला गवसणी घातली होती. (ENGvsPAK)

टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २००० धावा करणाऱ्यांच्या यादीत आता मोहम्मद रिझवान बाबर आझम सोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्या दोघांनीही ५२ डावात २००० धावांचा टप्पा पार केला. याच यादीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५६ डावात २००० धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचा केएल राहुल आहे. त्याने ५८ डावात २००० धावांचा टप्पा पार केला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने २००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ६२ डाव खेळले होते.

काल झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सामन्यात ७ बाद १५८ धावा केल्या. रिझवान व बाबर आजम या सलामीवीर फलंदाजांनी ८३ धावांची भागिदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. सामन्याच्या १० व्या षटकात बाबर ३१ धावाकरून बाद झाला. १० षटकानंतर पाकिस्तानचा डाव डगमगू लागला. यामुळे इंग्लंडसमोर पाकिस्तानने १५८ धावांचे आव्हानसमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग कराताना इंग्लंडने ४ गडी गमावत आव्हानाचा पाठलागकरून सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button