INDvsPAK T20 : भारत-पाक मॅचवरून ICC ची मोठी घोषणा, चाहत्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय | पुढारी

INDvsPAK T20 : भारत-पाक मॅचवरून ICC ची मोठी घोषणा, चाहत्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsPAK T20 : यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अनेक सामन्यांमध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदा आशिया चषक स्पर्धेत भिडणार असून त्यानंतर त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी दोन हात करणार आहेत.

ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येतील. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये आतापासून वातावरण तापले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने गुरुवारी सांगितले की ते 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG)वर होणार्‍या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित आयसीसी T20 विश्वचषक 2022 सामन्यासाठी अनारक्षित (स्टँडींग) तिकिटे जारी केली आहेत. फेब्रुवारीमध्ये या सामन्याची सर्वसाधारण तिकिटे पाच मिनिटांत विकली गेली होती. (INDvsPAK T20)

भारत पाकचा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे

t20 worldcup.com या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून 4,000 हून अधिक स्टँडिंग रूम तिकिटे आणि मर्यादित संख्येत अतिरिक्त सीट वाटप जारी केले जातील. स्टँडिंग रूम तिकिटे 30 डॉलर मध्ये उपलब्ध असतील आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्याची विक्री होईल. या तिकिटांमुळे जास्तीत जास्त चाहत्यांना हा सामना पाहता येईल. ICC हॉस्पिटॅलिटी आणि ICC ट्रॅव्हल अँड टूर्स प्रोग्रामद्वारे मर्यादित पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत, असे आयसीसीने म्हटले आहे. (INDvsPAK T20)

16 ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्यापूर्वी आयोजक एक पुनर्विक्री प्लॅटफॉर्म देखील सुरू करतील. आयसीसीने म्हटले आहे की जे चाहते पूर्वी तिकीट बुक करण्यास चुकले आहेत ते अद्याप तिकीट घेऊ शकतात. मुलांची तिकिटे 5 डॉलर पासून आणि प्रौढांसाठी 20 डॉलर पासून उपलब्ध आहेत. आयसीसी पुरुषांच्या टी 20 विश्वचषक फायनलसाठी तिकिटे अद्याप उपलब्ध आहेत. फायनल मॅच 13 नोव्हेंबर रोजी एमसीजीवर खेळली जाणार आहे, असेही आयसीसीने सांगितले. (INDvsPAK T20)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारत 23 तारखेला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कपची सुरुवात करणार आहे. पाकिस्तानशिवाय भारत दोन पात्रता संघांसह दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याशी भिडणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताला एकूण 5 सामने खेळायचे आहेत.

Back to top button