Sara Tendulkar-Shubman Gill Breakup : सारा-शुभमनचे ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो | पुढारी

Sara Tendulkar-Shubman Gill Breakup : सारा-शुभमनचे ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. या कामगिरीनंतर शुबमन गिल आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकरचे (Sara Tendulkar) नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवायला सुरुवात केली आणि दोघांच्या अफेअरच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या. (Sara Tendulkar-Shubman Gill Breakup)

दरम्यान, सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. याबद्दल विविध माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे समजते की, सारा आणि शुबमन यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. मात्र सारा शुबमनची बहीण शहनीलला इन्स्टावर फॉलो करत आहे. अशा परिस्थितीत दोघांचे ब्रेकअप झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र आतापर्यंत त्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही भाष्य केलेले नाही. 2019 च्या आयपीएलमध्ये दोघांचीही पहिल्यांदा दखल घेण्यात आली होती. शुभमन गिल आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळला. या हंगामानंतर गिलने ‘रेंज रोव्हर’ कार खरेदी केली. त्यानंतर त्याने नवीन कारसोबतचे त्याचे काही फोटो शेअर केले. त्यावर सारानेही कमेंट केली होती. हार्ट इमोजीसह साराने कमेंटमध्ये लिहिले होते की, ‘अभिनंदन.’ प्रत्युत्तरार गिलने सुद्धा हार्ट इमोजसह लिहिले की, ‘सारा तेंडुलकरचे खूप खूप आभार.’ इथूनच सारा आणि गिलच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. हार्दिक पांड्यानेही गिल आणि साराच्या पोस्टवर खूप धमाल केली होती. जेव्हा गिलने उत्तर दिले तेव्हा हार्दिकने साराच्या बाजूने गमतीने टिप्पणी केली, ‘शुबमन गिलचे स्वागत आहे, सारातर्फे…’

Shubman

भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) झिम्बाब्वे दौऱ्यात दमदार कामगिरी केली. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 122.50 च्या सरासरीने आणि 120.69 च्या स्ट्राइक रेटने 245 धावा केल्या. शेवटच्या वनडे सामन्यात गिलने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय शुभमनने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 34 चेंडूत 33 धावा आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात 72 चेंडूत 82 धावा केल्या होत्या.

Chat pic

मीम्सचा पूर…

शेवटच्या वनडेत गिलच्या (Shubman Gill) शतकानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. गिल आणि सारा यांच्याबद्दल युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर केले. दोघांच्या कथित अफेअरच्या बातम्यांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली.

शुबमनची आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी

IPL 2022 च्या विजेत्या गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात शुभमन गिलचे विशेष योगदान होते. त्याने 16 सामन्यात 34.50 च्या सरासरीने आणि 132.32 च्या स्ट्राईक रेटने 483 धावा केल्या. आयपीएलच्या या मोसमात त्याने 4 अर्धशतके झळकावली. गिलने 51 चौकार आणि 11 षटकार मारले. मेगा लिलावापूर्वी गुजरातने 3 खेळाडूंना करारबद्ध केले होते. यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्या, अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू रशीद खान यांच्यासह शुभमन गिलचा समावेश करण्यात आला होता.

गिलची आतापर्यंतची कारकीर्द

शुभमन गिलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 21 डावांमध्ये 30.47 च्या सरासरीने आणि 57.32 च्या स्ट्राईक रेटने 579 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 4 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 धावा आहे. याशिवाय त्याने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71.28 च्या सरासरीने आणि 105.27 च्या स्ट्राईक रेटने 499 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. वनडेमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या 130 आहे, जी त्याने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध केली.

 

Back to top button