Commonwealth Games 2022 : पीव्ही सिंधूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक | पुढारी

Commonwealth Games 2022 : पीव्ही सिंधूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत २१-१९, २१-१७ असा विजय मिळवून पीव्ही सिंधूने अंतिम फेरी गाठली. सिंधूने सलग दुसऱ्यांदा CWG फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आतापर्यंत वैयक्तिक फेरीत बॅडमिंटन स्टार्सची भारताची फळी वरचढ ठरली आहे. गोल्ड कोस्ट 2018 ची रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू प्रथम स्थानावर आहे. तिने क्वार्टरमध्ये मलेशियाच्या गोह जिन वेई विरुद्धचा पराभव केल्यानंतर आज तिचा सामना सिंगापूरच्या जिया मिन येओशी झाला.

सुरुवातीला सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनवर 1-0 ने आघाडी घेतली. मध्यांतरापूर्वी अंतिम पॉइंट घेतल्याने सिंधूच्या बाजूने 10-9 अशी खळबळजनक रॅली संपली. त्यानंतर तिने सातत्याने वेग पकडण्यास सुरुवात केली. अखेर तिने २१-१९, २१-१७ असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. या स्‍पर्धेतील भारताचे हे १५ वे सुवर्णपदक आहे. एुकण पदकांची संख्‍या ४२ झाली आहे. भारताने ११ रौप्‍य आणि ११ कांस्‍य पदक पटकावली आहे.

हेही वाचा :

Back to top button