Suryakumar Yadav Helicopter Shot : सूर्यकुमार यादवने विंडीज गोलंदाजाला दाखवल्या ‘दिवसाच्या चांदण्या’! (Video)

Suryakumar Yadav Helicopter Shot : सूर्यकुमार यादवने विंडीज गोलंदाजाला दाखवल्या ‘दिवसाच्या चांदण्या’! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Helicopter Shot : चौथ्या T20 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव केला. यावेळी भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव केवळ 24 धावा करू शकला असला तरी त्याने आपल्या स्फोटक खेळीने चाहत्यांची मने जिंकली. सूर्याने 2 षटकार आणि 1 चौकार फटकावत 14 चेंडूत 24 धावा केल्या. खरेतर सूर्याने असे फटके मारले, ज्याने केवळ चाहतेच नाही तर क्रिकेट समालोचकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. विशेषतः गोलंदाज ओबेद मॅकॉयच्या चेंडूवर त्याने मारलेला हेलिकॉप्टर शॉट बघण्यासारखा होता.

खरं तर, कोणताही फलंदाज जेव्हा हेलिकॉप्टर शॉट मारतो तेव्हा तो खेळपट्टीवर उभा राहतो आणि चेंडू सीमारेषेबाहेर पाठवतो. पण सूर्याच्या बाबतीत काही वेगळेच घडले आहे, ज्याने बरीच चर्चा होत आहे. झाले असे की, भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात, गोलंदाज मॅककॉयच्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारताना सूर्यकुमार हवेत उसळताना दिसला. ज्यामुळे गोलंदाज आश्चर्यचकित झाला. इतकेच नाही तर कॅरेबियन अष्टपैलू जेसन होल्डर गोलंदाज मॅककॉयशी चर्चा करताना दिसला. सूर्याच्या या धमाकेदार शॉटने उपस्थितांची वाहवा मिळवली. सामना पाहण्यासाठी आलेले चाहते हा शॉट पाहून डोलताना दिसले. (Suryakumar Yadav Helicopter Shot)

तिसर्‍या T20 मध्ये देखील सूर्याने आपल्या 76 धावांच्या खेळीत असे काही विचित्र शॉट्स मारले होते, जे पाहून जागतिक क्रिकेटमधील दिग्गजही हैराण झाले होते. आता चौथ्या टी-20 मध्ये सूर्याच्या हेलिकॉप्टर शॉटने पुन्हा एकदा मैदान मारले आहे. (Suryakumar Yadav Helicopter Shot)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 विकेट गमावत 191 धावा केल्या, त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 19.1 षटकात 132 धावा करत सर्वबाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, रवी बिश्नोई, अक्षल पटेल आणि आवेश पटेल यांनी 2 बळी घेण्यात यश मिळवले.

आणखी वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news