‘क्रिप्‍टो करन्‍सी ‘ ने आर्थिक व्‍यवहार करणारा ‘इसिस’चा दहशतवादी ‘एनआयए’च्‍या जाळ्यात

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनालाईन डेस्‍क : १५ ऑगस्‍टच्‍या पार्श्वभूमीवर हाय अर्लटवर असणार्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या संघटनेच्‍या संशयित दहशतवाद्‍याला 'एनआयए'ने अटक केली आहे. बाटला हाउस येथे ही कारवाई करण्‍यात आली. मोहसीन अहमद असे अटक करण्‍यात आलेल्‍या दहशतवाद्याचे नाव आहे. तो बाटला हाउसमध्‍ये राहत होता. विशेष म्‍हणजे दहशतवादी कारवायासाठी लागणारे पैशांचेव्‍यवहार तो क्रिप्‍टो 'क्रिप्‍टो करन्‍सी' व हवालाच्‍या माध्‍यमातून करत असल्‍याची धक्‍कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे.

अटक करण्‍यात आलेला मोहसीन अहमद हा इसिसमध्‍ये सक्रीय होता. त्‍याच्‍या घरातून आक्षेपार्ह साहित्‍य जप्‍त करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी 'एनआयए'ने २५ जून रोजीच गुन्‍हा दाखल केला होता. यानंतर सखोल तपास करण्‍यात आला. संशयित आरोप मोहसीन अहमद हा इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर भाड्याने राहत होता. तो परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रक्षोभक विचारांनी आणि विविध आमिष दाखवून 'इसिस'मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत होता, असा संशय आहे.

हवालातून आर्थिक व्‍यवहार

'एनआयए' मागील अनेक दिवस मोहसीन अहमदच्‍या मागावर होती. त्‍याच्‍या नावावर हवाला व 'क्रिप्‍टो करन्‍सी'ने आर्थिक
व्‍यवहार झाले असून, याचाही तपासही सुरु आहे. त्‍याचा म्‍होरक्‍या आणि त्‍याला पुरवली जाणारी आर्थिक रसद, तो कोणाला पैसे पाठवत होता, या सर्व बाबींचा तपास 'एनआयए' करत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news