नेदरलँडच्या फ्रेडरिक ओवरडिज्क या महिला क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केले. तिने पुरुषांनाही जे जमले नाही ते करुन दाखवले आहे. नेदरलँडची महिला क्रिकेट संघातील गोलंदाज फ्रेडरिक ओवरडिज्कने हे वर्ल्ड रेकॉर्ड फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात केले.
आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कप क्वालिफायर २०१२ मध्ये नेदरलँड आणि फ्रान्स यांच्यामध्ये सामना रंगला. या सामन्यात फ्रेडरिक ओवरडिज्कने चार षटकात फक्त ३ धावा देत तब्बल ७ विकेट घेतल्या. पहिल्यांदाच महिला टी२० क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात तब्बल ७ विकेट घेतल्या आहेत. फ्रेडरिक ओवरडिज्क च्या या भेदक माऱ्यामुळे फ्रान्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकात केवळ ३३ धावात गारद झाला. नेदरलँडने हे एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत सामना सहज जिंकला.
फ्रेडरिकने फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात फ्रान्सची कर्णधार तारा ब्रिटन, पॉपी मॅगओन, थिया ग्राहम, एमानुएले ब्रेलिवेट, ट्रेसी रॉड्रिग्ज, एमा चान्स आणि माएले कोगॉऊट यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यापूर्वी महिला टी२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचे रेकॉर्ड नेपाळच्या अंजली चंद हिच्या नावावर होते. तिने २०१९ मध्ये मालदीव विरुद्धच्या सामन्यात ६ विकेट घेतल्या होत्या.
तर पुरुषांमध्ये एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम भारताच्या दीपक चाहरच्या नावावर आहे. त्याने २०१९ मध्ये नागपूरमध्ये बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ७ धावात ६ विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : वाद्य तयार करणारा पुण्यातील अवलिया