राणे vs शिवसेना : भविष्यात युती झाल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच म्हणाले.. | पुढारी

राणे vs शिवसेना : भविष्यात युती झाल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच म्हणाले..

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राणे vs शिवसेना : मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. काही लोकांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही कायम विरोधात राहू यासाठी जन्माला आलेलो नाही. उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर पुढे कोणावर कारवाई झाली तर बोंब मारू नका, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रेवेळी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. अभिनेता सुशांत सिंह याची हत्याच झाली असून, त्याचबरोबर दिशा सालीयन हिच्या बलात्कार करणार्‍या आरोपींना हे सरकार पकडू शकले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राणे vs शिवसेना : युती झाल्यास काय करणार?

यावेळी नारायण राणे यांना भविष्यात युती झाल्यास भूमिका काय असणार? असे विचारण्यात आले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, भविष्यात युती झाली तर माझे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल.

या सरकारने राज्याची पूर्णपणे वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनामध्ये राज्याचा एक नंबर आहे. ही राज्याची ख्याती आहे. इथे सभा घेऊ नका, तिथे सभा घेऊ नका. हे फक्त राणेंसाठीच आहे. त्यांना सत्तेचा माज आला आहे. राणेंच्या जास्त पाठी लागू नका. नाहीतर मी तोंड उघडले ना तर तुम्हाला परवडणार नाही, हे लक्षात घ्या, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

मी गुन्हेगार होतो तर मी मुख्यमंत्री, आमदार, मंत्री कसा झालो? तुम्हीच मला ही पदे दिलीत ना? असे सवालही उपस्थित केला. ज्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता त्यावेळी सुपुत्राला सोबत नेण्याऐवजी बाळासाहेबांनी मला सोबत नेले, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

राज्याचा सध्या गुन्हेगारीचा रेट वाढला आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणासाठी अद्ययावत असे ओरोसला उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून, यासाठी 200 कोटी रूपये मंजूर झाले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button