

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही महिने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विरोट कोहली खराब फॉर्मचा सामना करत आहे. सातत्याने येणार्या अपयशामुळे त्याचे टीम इंडियामधील स्थानही धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी क्रिकेटपटू व क्रीडा समीक्षांच्या टीकेलाही तो सामोरे जात आहे. नुकतेच कर्णधार रोहित शर्मा याने विराटची पाठराखण केली होती. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय ) अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly On Virat Kohli ) यांनी आता मौन सोडले आहे.
३३ वर्षीय विराट हा सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे आज होणार्या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या सामन्यासही मुकणार आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याचे फॅन्सच विराटच्या आशतकीखेळीच्या प्रतीक्षेत आहेत. गेली अडीच वर्ष विराटने एकही शतक झळकावलेले नाही.
'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरभ गांगुली ( Sourav Ganguly On Virat Kohli ) यांनी म्हटलं आहे की, " प्रत्येक क्रिकेटपटूला करिअरमध्ये अशा कठीण दिवसांना सामोर जावे लागते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि मलाही अशा कठीण दिवसांना सामोर जावे लागेल हाेते. भविष्यातही अनेक खेळाडूंना अशा खराब फॉर्मला सामोरे जावे लागणारच आहे. सध्याचे दिवस हे विराटसाठी कठीण आहेत. मात्र त्याला यातून स्वत:च मार्ग काढावा लागणार आहे. श्रेष्ठ क्रिकेटपटू असल्याचे विराटने यापूर्वीच सिद्ध केले आहे. गेले १२ ते १३ वर्ष त्याचे मोठे योगदान आहे. निश्चित विराट कोहली खराब फॉर्ममध्ये बाहेर पडेल."
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील दमदार यशानंतर आता टीम इंडिया वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यातही १० गडी राखत दिमाखत जिंकला सज्ज झाला आहे. तीन वन डे सामन्यातील दुसरा सामना आज हाेणार आहे. विराट कोहली अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यातही ताे खेळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :