ENG vs NZ : क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच अशा विचित्र पद्धतीने बाद झाला फलंदाज (Video)

ENG vs NZ : क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच अशा विचित्र पद्धतीने बाद झाला फलंदाज (Video)
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : क्रिकेट हा सध्या अत्यंत रोमांचकारी खेळ बनत चालला आहे. या खेळातील उत्सुकता, उत्कंठा, जोश दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. टी २० प्रकाराने खरं तर काहीच्या निरस झालेल्या क्रिकेट या खेळाला जणू संजिवनी दिली आहे. आता या प्रकाराचा प्रभाव कसोटी सारख्या प्रकारात देखिल दिसताना आपणास पहायला मिळत आहे. अत्यंत संथ मानल्या जाणाऱ्या कसोटी या क्रिकेट प्रकाराकडे देखिल क्रीडारसिक पुन्हा वळू लागले आहेत. या प्रकारामध्ये देखिल आता चित्रविचित्र प्रकार घडताना सध्या पहाण्यात मिळत आहे. सध्या अशीच एक घटना इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) दरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्यात घडली आहे. अशी गोष्ट या पुर्वी क्रिकेट इतिहासात कधीच घडली नव्हती. चला तर मग काय ही घटना घडली आहे ती जाणून घेऊया.

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडच्या (ENG vs NZ) दौऱ्यावर आहे. यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. तिसरा कसोटी सामना लिड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर टॉम लेथम खाते उघडण्या आधीच शुन्यावर बाद झाला. त्यानंतर विल यंग हा दुसरा सलामीवीर देखिल अवघ्या २० धावांवर बाद झाला. कर्णधार केन विल्यमसन हा देखिल संघासाठी फारसे योगदान देऊ शकला नाही. तो ३१ धावांवर बाद झाला. त्याचा पाठोपाठ कॉनवे हा देखिल २६ धावांच्या स्कोरवर बाद झाला. न्यूझीलंडची अवस्था ८३ वर चार बाद अशी झाली होती.

फलंदाज हेन्री निकोल (Henry Nicholls) आणि डॅरियल मिशेल यांनी काहीसा संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हेन्री हा १९ धावांवर खेळत होता. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीच (Jack Leach) हा सामन्यातील ५६ वे षटक टाकण्यासाठी आला. लीच याच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल याने समोर जोरदार फटका मारला. फटका मारल्यानंतर चेंडू समोर नॉनस्ट्रायकरला उभा असलेल्या डॅरियल मिशेल यांच्या बॅटला लागला. तेथून चेंडू थेट मिडऑफला उभा असेलेल्या फिल्डरकडे जाऊन त्याने झेल पकडला. अशा प्रकारे क्रिकेट इतिहास पहिल्यांदा कोणताही फलंदाज इतक्या विचित्र पद्धतीने बाद होण्याची घटना घडली. (ENG vs NZ)

यानंतर याचा व्हिडिओ सर्वच समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये अनेक चित्रविचित्र घडत असतात. त्यापैकीच शुक्रवारची ही घटना आहे. हेन्री निकोल अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. असो या विचित्र घटनेची इतिहासात नोंद होईल व अशा पद्धतीने फलंदाज बाद होण्याच्या पद्धतीला नेहमी आठवले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news