पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) याने इंग्लंड विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने ३९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९८२मध्ये कपिल देव यांनी ५३ षटके गोलंदाजी केली. त्यांनी १६८ धावा देत ८ बळी मिळवले होते. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) याने दुसर्या कसोटी सामन्यात ४०.५ षटके गोलंदाजी करत १२६ धावा देत आठ बळी टिपले.
मोहम्मद सिराजने दुसर्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या डॉम सिब्ले, हसीब हमीद, जॉनी बेअरेस्टो आणि ओली रॉबिन्सन यांना बाद केले.
दुसर्या डावात जोस बटलर, मोईन अली. सॅम करन आणि जेम्स एंडरसन यांना बाद करत भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित केला. दोन्ही डावात त्याने सलग दोन बळी घेतले.
क्रिकेटची पंढरी मानला जाणार्या लॉर्डसवर सिराजने सर्वोत्कृष्ट कामगिरी नाोंदवली आहे.
सिराज मुळचा हैदराबादचा. सातवीमध्ये असताना त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
वेगवान गोलंदाज म्हणून धडाकेबाज कामगिरी करत सिराजने थेट आयपीएलमधील संघात स्थान मिळवले.
२०१७ मध्ये पहिल्या वर्षी त्याचा करार होता २.६ कोटी रुपयांचा.
यानंतर अवघ्या एक महिन्यात त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय संघात स्थान मिळवले.
सिराजची स्विंग गोलंदाजी नैसर्गिक आहे. त्याचबरोब त्याच भेदक बाउंसर हा दिग्गज फलंदाजांचीही भंबेरी उडवतो. यामुळे आयपीएलच्या सनराइजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉनर आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना त्याचे विशेष कौतुक आहे. रणजी क्रिकेटमध्येही त्याने ९ सामन्यांमध्ये विक्रमी ४१ बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. मात्र लहानपणापासूनच क्रिकेट हिचे त्याचे पॅशन होते. सिराजचे वडील हैदराबाद शहरात रिक्षा चालवत. मात्र त्यांनी नेहमीच सिराजच्या क्रिकेटच्या 'पॅशन'ला प्रोत्साहन दिले.
व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठीच सरावाचा खर्च महागडाच; पण सिराजच्या वडिलांनी त्याला कधीच आर्थिक चणचण भासू दिली नाही.
सिराजने भारतासाठी खेळावे हेच त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी अनेक अडचणीचा सामना करत सिराजसाठी क्रिकेट किट घेतला. याला कोणताही गोष्टींची कमतरत जाणवू दिली नाही.
सिराजनेही आपल्या वडिलांच्या कष्टाचे सार्थक करत अवघ्या काही वर्षांमुळे स्वत:ला सिद्ध केले. 'भारताच्या संघात माझी निवड झाली आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झालं', असे त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होते.
सिराजच्या वडिलांना खेळीसाठी त्याला सर्व सवलती दिल्या. एकदा स्थानिक मैदानावर सामना जिंकल्याबद्दल त्याच्या मामाने त्याला ५०० रुपयांचे बक्षीस दिले होते. हे क्रिकेटमधील त्याचे पहिले बक्षीस.
यानंतर काही वर्षांनी सिराजला आयपीएलमममध्ये २.६० कोटी रुपये मिळाले.
भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर सिराजने नवे घर घेतले. तसेच वडिलांना आता केवळ विश्रांनी घ्यावी, असे त्याने सांगितले होते.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असताना सिराजच्या वडिलांचे निधन झाले. एक स्वप्न पूर्ण होत असताना सिराजसाठी हा मोठा मानसिक धक्का होता. तरीही तो सावरला वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा ध्यास घेवूनच तो ऑस्ट्रेलियाच्या मैदानात उतरला होता.
माझी क्रिकेटमधील कामगिरीच वडिलांना खरी आदरांजली असेल, असे त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होते.
लॉर्डस कसोटीमध्ये विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना सिराज तोंडावर बोट ठेवत होता. याबाबत त्याने सांगितले की, माझ्या टीकाकारांना हे उत्तर आहे. माझ्यावर टीका करणारी बरच काही बोलत असतात. मला हे जमणार नाही. मी हे करुच शकत नाही, असा त्यांचा सूर असतो. त्यांना गप्प बसा, माझी कामगिरी पहा, हे सांगण्यासाठी विकेट घेतल्यानंतर मी जल्लोषाचा नवा अंदाज सुरु केला आहे., असे त्याने स्पष्ट केले अआहे.
आयपीएलमुळे मला प्रसिद्धी मिळाली मात्र रणजी ट्रॉफीने मला घडवले, असे सीराज अभिमानाने सांगतो.
लॉर्डसच्या मैदानावर विजय मिळवत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या मालिकेतील आणखी दोन सामने भारतासमोरील आव्हान आहे. मात्र सिराजसारखे गोलंदाज संघात असणे ही भारतासाठी मोठी आश्वासक बाब आहे.
हेही वाचलं का ?