IND vs ENG Odi : चहरच्या फिरकीसमोर ब्रिटींशांची दांडीगुल, 248 धावांत ऑलआऊट

IND vs ENG Odi : चहरच्या फिरकीसमोर ब्रिटींशांची दांडीगुल, 248 धावांत ऑलआऊट
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 246 धावा केल्या आहेत. भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 4 फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा मोईन अलीच्या फलंदाजीतून आल्या. त्याने 64 चेंडूत 47 धावांची खेळी खेळली.

युझवेंद्र चहलने टीम इंडियासाठी अप्रतिम गोलंदाजी केली आणि एकाही इंग्लिश फलंदाजाला क्रीजवर स्थिरावू दिले नाही. जॉनी बेअरस्टोच्या रूपाने इंग्लंडला दुसरा धक्का बसला. त्याला युझवेंद्र चहलने बोल्ड केले. बेअरस्टो 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर चहलने जो रूटलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 21 चेंडूंचा सामना केला आणि त्याला केवळ 11 धावा करता आल्या. चहल इथेच थांबला नाही, त्याने बेन स्टोक्सलाही एलबीडब्ल्यू आऊट केले. स्टोक्स 23 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. मोईन अली जो संयमी फलंदाजी करत क्रिजवर स्थिरावला होता, पण त्यालाही चहरने माघारी धाडले. त्याने 47 धावा केल्या.

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची सुरुवात केली. पण 9 व्या षटकत हार्दिक पांड्याने जेसन रॉयला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. रॉयने 33 चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. सूर्यकुमारने त्याचा झेल पकडला. रॉय आणि बेअरस्टो यांच्यात 41 धावांची भागिदारी झाली. युझवेंद्र चहलने इंग्लंडला दुसरा झटका देत भारताला दुसरे यश मिळवून दिले. चहलने 15 व्या षटकात बेअरस्टोला (38) क्लिन बोल्ड केले. बेअरस्टोने रुट यांच्यात 31 धावांची भागिदारी झाली. जो रूटला एलबीडब्ल्यू आऊट करून चहलने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. या सामन्यातील चहलचे हे दुसरे यश आहे. रूटने 11 चेंडूत 11 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर फलंदाजीला आला आहे. पण तो अपयशी ठरला आणि शमीने त्याला अवघ्या 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यावेळी यजमान इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 87 होती. इंग्लंडचा निम्मा संघ 102 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. यजमानांनी 21.3 मध्ये पाचवी विकेट गमावली. बेन स्टोक्स 21 धावा करून पाचवा फलंदाज म्हणून बाद झाला. चहलने त्याची विकेट घेतली. हार्दिक पांड्याने लियाम विलिंग्स्टनला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. लिविन्स्टनने दोन चौकार आणि तब्बल षटकारांच्या मदतीने 33 धावांची खेळी केली. लिविन्स्टन आणि मोईन अली यांनी सहाव्या विकेटसाठी 45 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली.

भारताने ओव्हलवरील पहिला सामना 10 गडी राखून एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने गुरुवारी लॉर्ड्स मैदानावर उतरेल आणि पुन्हा एकदा इंग्लंडवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल.

भारताचा संघ असा :

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल.

इंग्लंडचा संघ :

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (कर्णधार), जो रूट, लियाम लिव्हिंगस्टन, बेन स्टोक्स, मोईन अली, डेव्हिड विली, रीस टॉप्ली, क्रेग ओव्हरटन, ब्रायडेन कार्स.

प्रदीर्घ काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेला भारताचा माजी कर्णधार कोहली दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकला होता. तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त आहे. तर रोहित शर्मा आणि त्याच्या संघाला आशा आहे की त्यांच्या गोलंदाजांना लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरही ओव्हलसारखी मदत मिळेल. बुमराह चांगला फॉर्ममध्ये आहे तर मोहम्मद शमी कोणत्याही विरोधी फलंदाजी फळीला उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news