जो बायडेन म्‍हणाले, … तर तालिबानला गंभीर परिणाम भोगावे लागतील | पुढारी

जो बायडेन म्‍हणाले, ... तर तालिबानला गंभीर परिणाम भोगावे लागतील

वॉशिंग्‍टन ; पुढारी ऑनलाईन: तालिबानने अफगाणिस्‍तानवर आपली हुकूमत प्रस्‍थापित केली आहे. त्‍यांनी सत्ता काबीज केल्‍याने देशभरात अराजक माजले आहे. यावर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. तालिबानी सरकारने अमेरिकेविराेधात भूमिका घेतल्‍यास त्‍यांना कधीही विचार केला नसेल एवढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जो बायडेन यांनी दिला आहे.

राष्‍ट्राला संबोधित करताना जो बायडेन म्‍हणाले, अफगाणिस्‍तानमधील नेत्‍यांनी तालिबान विरोधात संघर्ष करण्‍याची गरज होती.
मात्र त्‍यांनी संघर्ष न करताच स्‍वत:ला पराभूत घोषित केले आणि देश सोडून पळून गेले.

यामुळे अफगाणिस्‍तानमधील लष्‍करानेही माघार घेतली.

अफगाणिस्‍तानमधून अमेरिकेचे लष्‍कर माघारी घेण्‍याचा निर्णय योग्‍य होता.मात्र या देशात युद्‍धजन्‍य परिस्‍थिती आमच्‍या अपेक्षापेक्षा फारच लवकर निर्माण झाली आहे, असेही ते म्‍हणाले.

अमेरिकेविरोधात भूमिका घेतल्‍यास जबर किंमत माेजावी लागेल

तालिबानी सरकारने अमेरिकेच्‍या विरोधात भूमिका घेतल्‍यास त्‍यांना कधीही विचार केला नसेल एवढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बायडेन यांनी दिला.

अमेरिकेच्‍या राजकीय दुतावासातील कर्मचार्‍यांना सुरक्षित मायदेशी परत आणताना तालिबान्‍यांनी आडकाठी आणली किंवा अमेरिकेच्‍या नागरिकांना धोका पोहचेल अशी कृती केली तर अमेरिका याला प्रचंड ताकदीने द

उत्तर देईल, असेही ते म्‍हणाले.

मागील २० वर्ष अफगाणिस्‍तानमधून अमेरिकेच्‍या लष्‍कर माघारी घेण्‍याचा निर्णयासाठी कधीच योग्‍य वेळ नव्‍हती.

युद्‍धग्रस्‍त देशामंधील दहशतवादी हल्‍ले थांबवणे हेच अमेरिकेचा मुख्‍य उद्‍देश होता, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

काबूल येथून विशेष विमानाने भारतीय अधिकारी मायदेशात दाखल

दरम्‍यान, अफगाणिस्तान मधील काबूल येथून भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन आलेले भारतीय हवाई दलाचे सी-१७ हे विमान आज सकाळी गुजरातमधील जामनगर येथे दाखल झाले. अफगाणिस्‍तान मधील भारतीय दुतावासातील कर्मचार्‍यांसाठी भारतीय हवाई दलाचे हे विशेष विमान काबूल येथून भारताकडे रवाना झाले होते. ते आज जामनगर येथे उतरले.

सकाळी अफगाणिस्‍तानमधील भारतीय नागरिकांना परत घेवून येणारे हे विशेष विमान अमेरिकी सैनिकांच्‍या संरक्षणात बाहेर काढण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाच्‍या सी-१७ विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झाले होते.

भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्‍या संरक्षणात बाहेर काढण्‍यात आलं आहे. या विमानात सुमारे १४० भारतीय आहेत.

भारतीय राजदूत आर. टंडन यांच्‍यासह इतर अधिकारी कर्मचार्‍यांना काबूलमधून परत भारतात आणण्‍यात आले आहे.
त्‍याचबरोबर तेथे अडकलेल्‍या सुरक्षारक्षकांनाही भारतात परत आणण्‍यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :  काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

 

Back to top button