T-20 Word Cup : टीम इंडियाला पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिला ‘हा’ सल्‍ला | पुढारी

T-20 Word Cup : टीम इंडियाला पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिला 'हा' सल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. गेल्या टी२० विश्वचषकात झालेल्या भारत वि. पाकिस्तान या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने विजय मिळवला होता. याच्यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० विश्वचषकात होणाऱ्या भारत वि. पाकिस्तान सामन्याबाबत भारताला इशारा दिला आहे. एका यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने या सामन्याबाबत मत व्यक्त केले आहे. (T-20 Word Cup)

पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाला उत्तर देण्यासाठी टी-२० विश्वचषकात २३ ऑक्टोबर राेजी भारतीय संघ मैदानात उतरेल.  पाकिस्तान वि. भारत या सामन्याची प्रक्षेक नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिग्गज माजी क्रिकेटरही या सामन्यात उत्सुक आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आत्तापासूनच प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. (T-20 Word Cup)

या सामन्‍याबाबत बाेलताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्‍हणाला की, भारतीय संघ योग्य प्लेइंग इलेवनसोबत मैदानात उतरला तर भारतीय संघाला जिंकण्याची मोठी संधी आहे. (T-20 Word Cup)

दबावाला झुगारणारे खेळाडू हवेत

भारताने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी अशा खेळाडूंसोबत मैदानात उतरावे जे दबावाला सामोरे जावू शकतील. दबावात न येता संपूर्ण लक्ष्य आपल्या खेळावर ठेवायला हवे. मला विश्वास आहे की, भारतीय संघ मजबूत असणार आहे, यावेळेस सामना पाकिस्तानसाठी सोपा नसेल,  असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले. (T-20 Word Cup)

भारताने योग्य संघ निवडला, तर पाकिस्तानला विजय मिळवणे सोपे नाही. सध्या या सामना कोण जिंकेल हे सांगणे फार कठीण आहे. आशा आहे की, हा सामना अटीतटीचा होईल. भारत वि. पाकिस्तान सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. हा सामना पाहण्यासाठी १ लाखांपर्यंत प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. (T-20 Word Cup)

हेही वाचलतं का?

Back to top button