भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या पत्नीबरोबरच्या डेटबाबत एक वक्तव्य केले आहे. त्याने हे वक्तव्य दिनेश कार्तिक बरोबरच्या संवादावेळी केले.
रोहित शर्मा दिनेश कार्तिक बरोबरच्या संवादावेळी म्हणाला की सुरुवातीला त्याला आणि रितिकाला ते दोघे डेटिंग करत आहेत असे वाटत नव्हते. रोहित शर्मा म्हणाला की त्याचे आणि रितिकाचे नाते एकदम सरळ होते. आम्ही दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र होतो. पण, मित्रांना आमच्या दोघातील नात्यात मैत्रीव्यतिरिक्त अजून वेगळे काहीतरी दिसत होते.
रोहित शर्मा स्काय स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'आम्हाला असे काही वाटत नव्हते. आम्ही दोघे एकत्र काम करत होतो. ती अजूनही माझी व्यवस्थापक आहे आणि त्यावेळीही तीच माझी व्यवस्थापक होती. आमच्यात साधे व्यावसायिक नाते होते.
त्यानंतर अनेक तास एकत्र काम केल्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो होतो. मी लोक काय म्हणत आहेत याचा विचार करत नव्हतो, मात्र माझ्या जवळच्या मित्राना आमच्या नात्याबद्दल काहीतरी वेगळेच जाणवत होते.'
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, आम्ही दोघे एकमेकांची काळजी घेत होतो. त्यानंतर माझे मित्र जो काही विचार करत होते तो नंतर खरा ठरला. पण, रोहितला त्याच्या मित्रांना रितिका आणि तो एकमेकांना डेट करत होते हे कसं सांगावं हे सुरुवातीला कळतच नव्हतं. जर मी ही बातमी माझ्या मित्रांना सांगितली असती तर त्यांनी मला जगूच दिलं नसतं.
'ती मैत्री आणि एकमेकांची काळजी घेणं होते. पण आम्ही एकमेकांना अधिकृतरित्या डेटिंग करण सुरु केलं होतं. मला हे मित्रांना कसं सांगाव हे कळत नव्हतं. मी हे कसं सांगव याचा विचार करत होतो. मला वाटत होतं की ही लोकं मला जगू देणार नाहीत.' असे रोहितने सांगितले.
रोहित शर्माने भारतकडून आतापर्यंत ४० कसोटी, २२७ एकदिवसीय आणि १११ टी२० सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत कसोटीत 2810 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ९२०५ आणि टी२० मध्ये २८६४ धावा केल्या आहेत.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : बोरीवलीत बनलाय चक्क नो किसिंग झोन
https://youtu.be/himRwgmAiXI