रजत पाटीदार : जाणून घ्या त्याचा अनसोल्ड ते झणझणीत शतकापर्यंतचा संघर्षमय प्रवास

रजत पाटीदार : जाणून घ्या त्याचा अनसोल्ड ते झणझणीत शतकापर्यंतचा संघर्षमय प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकत्त्यात काल (दि. २५) झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB ) विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् सामन्यात (IPL) बेंगलोर विजयी झाला. रजत पाटीदारने झळकावलेल्या झणझणीत शतकाच्या बळावर बेंगलोरने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावांचा डोंगर उभारला होता. पण हे आव्हान लखनौला पार करता आले नाही. हा सामना बेंगलोरने १४ धावांनी खिशात टाकला आणि विजयाबरोबर चर्चेत आला तो म्हणजे बेंगलोर टीमचा खेळाडू रजत पाटीदार. हा तोच खेळाडू आहे ज्याला यंदाच्या आयपील लिलावात कुठल्याच संघाने खरेदी केले नव्हते. त्याचबरोबर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. असे असतानाही आयपीएलमध्ये शतक बनवणारा पॉल वॉलथाटी, मनीष पांडे, देवदत्त पडिक्कल नंतर तो चौथा खेळाडू ठरला आहे.

१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला दोन दिवस चाललेल्या आयपीलच्या लिलावात अनेक खेळाडूंना घरी परतावे लागले होते. कारण त्यांना कोणीच खरेदीदार नव्हता. यामध्ये एक नाव होत ते रजत पाटीदार याचं. आरसीबीने सीझन सुरु झाल्यानंतर लवनिथ सिसोदियाच्या जागी पाटीदारला घेतलं. यानंतर मात्र पाटीदारने चांगली खेळी करत संघात आपलं नाव पक्कं केलं.

बुधवारी (दि,२५) लखनौसोबत झालेल्या सामन्यात संघाचे महत्वाचे खेळाडू तंबूत परतत असताना शतकी फलंदाजी केली आणि संघाला २०७ धावांच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. कप्तान फाफ डुप्लेसिस पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट गेल्यानंतर रजत मैदानात उतरला. पण लवकरच विराट कोहली आणि ग्लेन मैक्सवेल बाद झाल्याने संघाची अवस्था डळमळीत झाली. यावेळी गरजेनुसार कधी संयमी तर कधी आक्रमक खेळी करत त्याने ५४ बॉल मध्ये ११२ धावा बनवून संघाला मजबूत अवस्थेत नेले. या आधाराने बेंगलोरचा विजय झाला आणि लखनौला मात देत त्यांना स्पर्धेबाहेर केले.

१९९३ मध्ये मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये जन्मलेल्या रजतने आठव्या वर्षांपासूनच क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सुरुवातीला गोलंदाज म्हणून करियरची सुरवात केलेल्या रजतने लवकरच फलंदाजीत आपले स्थान बनवले. २०१५ ला रणजी ट्रॉफीमधून सुरुवात केलेल्या रजतला २०२१ मध्ये आरसीबीने प्रथम खरेदी केले होते.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news