आमिर खानला हवी आहे आयपीएल खेळण्याची संधी; रवी शास्त्रीकडे केली शिफारस

आमिर खानला हवी आहे आयपीएल खेळण्याची संधी; रवी शास्त्रीकडे केली शिफारस
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करताना दिसत नाही. पण लवकरच तो करीना कपूरसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. आमिरच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'मैं की करां' हे गाणे रिलीज झाले होते, हे गाणे प्रक्षेकांना खूप आवडले होते. आमिर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. त्याचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो आयपीएलसाठी संधी मागताना दिसत आहे.

आयपीएलचे पंधरावा हंगाम शेवटचा टप्प्यात आहे. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी प्रत्येक सामन्यांसाठी हजेरी लावली. या दिग्गजांची काही काळासाठी चर्चा देखील झाली. आता मात्र अभिनेता आमिर खान चर्चेत आला आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो क्रिकेटचा सराव करताना दिसत असून त्याने थेट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संधी मिळेल का? अशी विचारणा केली आहे. त्याच्या या प्रश्नाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.

आमिर खान याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नेटमध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट या क्रीडाविषयक चॅनेलने साेशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. सराव करत असताना त्याने म्हटले आहे की, मला आयपीएलमध्ये संधी मिळेल का?

आमिर याच्या प्रश्नाला भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उत्तर दिलं आहे. शास्त्री गुरुजी म्हणाले की, 'आमिरला फुटवर्कवर काम करण्याची गरज आहे. तो नेटमध्ये चांगला सराव करताना दिसत आहे. मात्र फुटवर्कवर त्याला आणखी काम गरण्याची गरज आहे. त्याला कोणत्याही टीममध्ये संधी दिली मिळू शकते,' असे त्यांनी म्हटले आहे.

रवी शास्त्री यांच्या या विधानालाही आमिर खानने तसेच मजेशीर उत्तर दिले आहे. 'रवी तुला माझे फुटवर्क पसंद पडलेले नसल्यामुळे मी निराश झालो आहे. मला वाटते आहे की तु माझा लगान हा चित्रपट पाहिला नाहीस. मी ज्या टीममध्ये खेळत असेल ती टीम लकी असतेच. यामुळे तू माझी चांगली शिफारस कर अशी विनोदी प्रतिक्रिया आमिर खानने रवी शास्त्री यांना केली केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news