कृषिकन्या किरण नवगिरे पोहोचली ‘आयपीएल’मध्ये | पुढारी

कृषिकन्या किरण नवगिरे पोहोचली ‘आयपीएल’मध्ये

सुनील जगताप

पुणे : ‘ती’ ग्रामीण भागातून आलेली एक साधी सरळ अ‍ॅथलीट. घरची परिस्थिती हलाखीची… पण पुण्याच्या आझम क्रिकेट अकादमीत तिने क्रिकेटचे धडे गिरवले अन् आता तिने थेट गवसणी घातली आहे महिलांच्या ‘आयपीएल’ला!

CBI raid on Chidambaram : कार्ति चिदंबरम यांच्‍या घरासह कार्यालयांवर सीबीआयचे छापे, तीन राज्‍यांमध्‍ये कारवाई

ही कामगिरी करणारी ‘ती’ आहे, एका शेतकर्‍याची मुलगी. किरण नवगिरे तिचं नाव. ‘पुढारी’शी संवाद साधताना किरण म्हणाली, ‘माझे आई-वडील शेतकरी आहेत. मला दोन भाऊ आहेत. सोलापूरमध्ये शालेय स्तरावरच अ‍ॅथलेटिक्समध्ये करिअर करीत असताना पदवीच्या शिक्षणासाठी बारामतीला यावे लागले. बारामतीत आल्यानंतरही भालाफेक, शॉटपुट आणि 100 मीटर शर्यत या प्रकारात पदके जिंकली. कालांतराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्वही केले आहे.’

Gyanvapi controversy : काशीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद आहे तरी काय?, जाणून घ्या १२ मुद्दे

किरणने नंतर आवडत्या क्रिकेट कडे लक्ष वळवले. आझम कॅम्पसमधील अकादमीत जॉन्टी गिलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. सध्या गुलजार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते आहे. नागालँड संघाकडून खेळताना वरिष्ठांच्या टी-20 स्पर्धेत तिने 76 चेंडूंत 10 चौकार आणि 16 षटकारांसह नाबाद 162 धावा काढत विक्रमी कामगिरी केली आहे.

मद्रास : कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाॅट्स ॲपद्वारे घेतली सुनावणी; जाणून घ्या केस

महेंद्रसिंह धोनीच आदर्श

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी हा किरणचा आदर्श आहे. धोनी ज्या पद्धतीने शांत राहतो आणि मोठे षटकार मारतो, ते मला आवडते. मी त्याच्यापासून प्रेरित आहे. जेव्हा मी खेळते, तेव्हा मी तेच करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे किरणने यावेळी सांगितले. क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट होत असून, आत्ताच्या ‘आयपीएल’मध्ये मी माझी कामगिरी अजून उंचावणार आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकून द्यायचे माझे ष्वप्न आहे आहे, असे किरण सांगते.

Back to top button