बार्सिलोना सोडताना लिओनेल मेस्सी याला अश्रू अनावर

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी

माद्रिद; वृत्तसंस्था : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाला 'अलविदा' म्हटले. रविवारी माध्यमांशी बोलताना लिओनेल मेस्सी याने बार्सिलोना सोडत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी मेस्सीला रडू कोसळले.

'हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, मी क्लब सोडण्याचा विचारही केला नव्हता,' असे मेस्सीने निरोपाच्या भाषणात म्हटले.

लिओनेल मेस्सी
लिओनेल मेस्सी

मेस्सी गेली 21 वर्षे बार्सिलोना संघाशी संबंधित होता. त्याच्या कराराची मुदत 30 जून रोजी संपली आणि क्लबसोबतच्या नवीन करारावर सहमती होऊ शकली नाही.

क्लबला अलविदा म्हणताना मेस्सीने आपल्या मानधनाबाबत मोठा खुलासा केला आहे.

मेस्सी म्हणाला, 'क्लबसोबत चांगला आणि वाईट दोन्ही काळ पाहिला. मात्र, लोकांचे प्रेम कायम राहिले. मला आशा आहे की, मी परत येईन आणि या क्लबचा एक भाग होऊ शकेन.

या क्लबला जगातील सर्वोत्तम क्लब बनवण्यासाठी मी काहीही करू शकतो; पण सध्या माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी माझे मानधन 50 टक्क्यांनी कमी करण्याची ऑफर दिली होती. मात्र, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.'

मेस्सीचे मोठे योगदान…

"मेस्सी आता एफसी बार्सिलोनामध्ये असणार नाही. यामुळे क्लबच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार नाहीत. या गोष्टीचा दोघांनाही खेद आहे. मेस्सीचे मोठे योगदान आहे. या योगदानाबद्दल एफसी बार्सिलोना संघ मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, असे एफसी बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news