Asian Games 2022 : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली

Asian Games 2022 : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली

बीजिंग : पुढारी ऑनलाईन

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून १० ते २५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेली आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2022) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असे आशियाई खेळ आयोजन समितीकडून सांगण्यात आले आहे.

शांघाय शहरात कोरोनाची नवीन लाट आली आहे. यामुळे येथे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे १९ व्या आशियाई स्पर्धेबाबत अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी ताश्कंद येथे बैठक झाली. सध्यस्थिती पाहता स्पर्धा पुढे ढकलणे हा एकमेव पर्याय असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

"चीनी ऑलिम्पिक समिती (COC), Hangzhou आशियाई खेळ आयोजन समिती (HAGOC) आणि OCA कार्यकारी मंडळाने (EB) चीनमधील हांगझोऊ येथे होणारी 19th Asian Games १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे." असे OCA ने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन १० ते २५ सप्टेंबर दरम्यान केले होते. आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

"१९व्या आशियाई खेळांच्या नवीन तारखा OCA, COC आणि HAGOC निश्चित करेल आणि भविष्यात त्याची घोषणा केली जाईल," असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

OCA ने सांगितले की, HAGOC समोर आव्हाने असूनही वेळेत स्पर्धा घेण्यासाठी तयार आहे. पण, महामारीची सध्यपरिस्थिती आणि स्पर्धेबाबत खबरदारी घेऊन निर्णय घेतला जाईल. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे नाव आणि चिन्ह कायम राहणार आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून ही स्पर्धा सुरळीत पार पडेल, अशी आशा OCA ने व्यक्त केली आहे. दरम्यान, या स्पर्धेमध्ये (Asian Games 2022) सुमारे ११ हजार क्रीडापटू ६१ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार होते.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news