Virat Kohli : 'अनेक संघ मला घेऊ शकले असते, पण कोणीही विश्वास दाखवला नाही' | पुढारी

Virat Kohli : 'अनेक संघ मला घेऊ शकले असते, पण कोणीही विश्वास दाखवला नाही'

पुढारी ऑनलाईन डेस्क

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये विराट कोहली (Virat Kohli) एकमेव असा एक फलंदाज आहे जो २००८ पासून एकाच संघासोबत खेळत आहे. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीला २००८ च्या ड्राफ्टमधून RCB ने (Royal Challengers Bangalore) विकत घेतले होते. तेव्हापासून आतापर्यंत कोहली RCB संघात कायम आहे. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २१८ सामन्यांत ३६.६४ च्या सरासरीने ६,४८६ धावा केल्या आहेत. कोहलीने नुकतेच फ्रँचायझीबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. त्याने म्हटले की, २००८ दरम्यान इतर संघांना मला घेण्याची संधी होती, परंतु कोणत्याही संघाने विश्वास दाखवला नाही.

विराट कोहली, हल्लीच स्टार स्पोर्ट्सवरील आरसीबीच्या फ्रँचायझी शोमध्ये म्हणाला होता की, “या फ्रँचायझीने मला पहिल्या तीन वर्षांत अनेक संधी दिल्या आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. असे अनेक संघ होते ते मला संधी देऊ शकले असते. पण त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता.”

आयपीएल (IPL) २००८ च्या लिलावात अंडर १९ मधील खेळाडूंना ड्रॉफ्टच्या माध्यमातून निवडायचे होते. पहिला खेळाडू निवडण्याची संधी दिल्ली संघाला मिळाली. त्यावेळी विराट कोहलीच्या आधी प्रदीप सांगवानची निवड करण्यात आली. सध्या प्रदीप सांगवान गुजरात टायटन्स संघात आहे. दुसरा खेळाडू निवडण्याची वेळ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची होती. त्यांनी विराटला आपल्या संघात घेतले.

२००८ पासून आरसीबी संघाचा एक भाग असलेल्या विराट कोहलीकडे (Virat Kohli) २०१३ मध्ये संघाचे कर्णधारपद देण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ २०१६ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. पण ट्रॉफी जिंकू शकला नाही. कोहलीने २०२१ नंतर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या ११५ व्या हंगामात फाफ डुप्लेसी संघाचे नेतृत्व करत आहे.

हे ही वाचा :

Back to top button