रवी दहिया: तब्बल ८ गुणांनी पिछाडीवर असूनही अशी पालटली ‘बाजी’! | पुढारी

रवी दहिया: तब्बल ८ गुणांनी पिछाडीवर असूनही अशी पालटली ‘बाजी’!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित केले. त्याने ५७ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला.

आता अंतिम सामना गुरुवारी होईल, जिथे रवी सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकेल.

रवी उपांत्य फेरीत ८ गुणांनी पिछाडीवर होता. वाटलं की तो आता पराभूत होईल. पण १ मिनिट शिल्लक रवीने कझाकिस्तान कुस्तीपटूला पराभवाची धूळ चारली.

पहिल्या फेरीत २-१ अशी आघाडी घेणारा रवी दुसऱ्या फेरीत नुरिस्लामच्या बाजीत अडकला. परिणामी, नुरिस्लामने एकानंतर एक असे २-२ गुण मिळवले. त्यामुळे त्याने ९-२ गुणांची मुसंडी मारली.

यानंतर, रवीला सामन्यात पुनरागमन करणं कठीण होतं. पण त्याने हिम्मत हारली नाही. रवि पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या इराद्याने नुरिस्लामला भीडला. रचिच्या डोक्यात कसल्याही परिस्थितीत प्रतिस्पर्धी नुरिस्लामला चीतपट करायाचा हाच विचार सुरू होता.

त्यामुळे इच्छाशक्ती आणि आपल्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर याने एकापाठोपाठ एक डाव टाकून बचाव आणि आक्रमक खेळाच्या जोरावर ३ गुण मिळवले.

त्यामुळे गुणांची आघाडी ५-९ आली. आता फक्त एक मिनिटाचा खेळ शिल्लक होता. रवीने पहिल्या स्टेकवर नुरिस्लामचा पाय पकडला आणि त्याला उलथवून टाकलं. त्यामुळे रविला आणखी २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने सामना जिंकून इतिहास रचला.

Back to top button