महिला हॉकी : भारताचं सुवर्ण स्वप्न भंगले, अर्जेंटिनाकडून पराभव | पुढारी

महिला हॉकी : भारताचं सुवर्ण स्वप्न भंगले, अर्जेंटिनाकडून पराभव

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये महिला हॉकीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय संघाचा २-१ असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

आता भारतीय संघाला रिओ ऑलिम्पिक गेम्स २०१६ च्या सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनविरुद्ध कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागेल. नेदरलँडने ब्रिटनचा पहिल्या उपांत्य फेरीत ५-१ ने पराभूत केले होते.

सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली, पण संघ त्याचा फायदा उचलण्यात अयशस्वी ठरला.

अर्जेंटिनाची कर्णधार मारिया नोएल बॅरिओन्यूवोने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर सामन्याच्या १८ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. याचबरोबर अर्जेंटिनाला आघाडी मिळाली.

ही आघाडी चौथा क्वार्टर संपेपर्यंत कायम राहिली आणि अजेंटिनाने अंतिम फेरी गाठली. सुवर्ण पदकाच्या लढतीसाठी त्यांचा नेदरलँडशी सामना होणार आहे.

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली.

भारतीय हॉकी संघाने पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत अर्जेंटिनाविरुद्ध १-० अशी आघाडी कायम राखली. गुरजीत कौरने सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करून भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली.

भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला अर्जेंटिनाविरुद्धची आघाडी गमावली. अर्जेंटिनाने १-१ गोलची बरोबरी साधून सामन्यात पुनरागमन केले.

अजेंटिनाला दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताच्या खेळाडूंनी हे आक्रमण भक्कम बचाव करत परतवून लावले. पण तिसऱ्याच मिनिटाला पुन्हा अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी त्यांच्या खेळाडूंनी कसली चूक न करता भारताचा बाचाव भेदला आणि १-१ गोलची बरोबरी साधली.

सामन्याच्या १८ व्या मिनिटाला मिळालेल्या या पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनासाठी मारिया नोएल बॅरिओन्यूवोने गोल केला. त्यानंतर सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये मारियाने आणखी एक गोल केला. या गोलची परतफेड करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी जीवाचे रान केले पण त्यांना यश आले नाही.

दरम्यान, भारतीय गोलरक्षक सविता पुनियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तिने सामन्यात नऊ वेळा चेंडूला गोल जाळ्यात जाण्यापासून रोखले. पण अर्जेंटिनाविरुद्ध तिला भक्कम बचाव करता आला नाही. अर्जेंटिनाला ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी २ चे त्यांनी गोलमध्ये रूपांतर केले.

Back to top button