कोल्हापूर : ‘बंटी-बबली’ने व्यावसायिकांना ८८ लाख रुपयांना गंडविले

कोल्हापूर : ‘बंटी-बबली’ने व्यावसायिकांना ८८ लाख रुपयांना गंडविले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : स्क्रॅप व्यवसायात गुंतवणुकीवर दरमहा 80 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील तीन व्यावसायिकांना 'बंटी-बबली'ने सुमारे 88 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुरेंद्र पाटील व सुरेंद्र साहेबराव पाटील (रा. रूईकर कॉलनी, कोल्हापूर) या संशयित दाम्पत्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करून या दोघांना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

प्रियतोष प्रताप भोसले (रा. सरनोबतवाडी) यांना पाटील दाम्पत्याने घरी बोलावून गोवा येथील रिसॉर्टचे नूतनीकरणाचे काम तुम्हाला देतो, असे सांगितले. त्यांच्याशी मैत्री व ओळख वाढवून एका स्क्रॅप व्यवसायात गुंतवणुकीवर दरमहा 80 हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले.

त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेऊन त्यांना काही महिने परतावाही दिला. भोसले यांना एकूण रकमेपैकी 4 लाख 50 हजार रुपये परत केल्यानंतर पाटील दाम्पत्याने पुढील परतावा देण्याचे थांबवले. त्याबाबत भोसले यांनी वारंवार विचारणा करूनही दोघांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर भोसले यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

आणखी दोघांची फसवणूक

या जोडीने अशाच प्रकारे संदीप दत्तात्रय बापट यांची 24 लाख रुपयांची, तर जोतिराम गोपाळराव सूर्यवंशी यांची 28 लाख 85 हजारांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. आणखीन कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, तर शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news