IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघावर मधमाशांचा हल्ला; खेळाडुंनी घातले लोटांगण | पुढारी

IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघावर मधमाशांचा हल्ला; खेळाडुंनी घातले लोटांगण

पुढारी; ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाच्या मागची साडेसाती काही केल्या हटायला मार्ग नाही. मुंबईचा संघाला आयपीएलच्या यंदाचा (IPL 2022) हंगामात एकही सामना अजूनही जिंकता आलेला नाही. त्यांना सलग सहा सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा आहे. दर सामन्यावेळी काहीना काही कारणाने संघाला खराब कामगिरीचा फटका बसतो आहे. या सगळ्‍या गोष्टींमुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. पण, या सगळ्या संकटात अडकले असताना मुंबईच्या संघावर नैसर्गिक संकटांचा सामना सुद्धा करण्याची वेळ आली आहे. सरावसामन्या दरम्यान मैदानावर मधमाशांनी हल्ला (bee attack) केला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही.

मुंबई इंडियन्स (IPL 2022) गुरुवारी (दि. २१) त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जसोबत (chennai super kings) भिडणार आहे. या सामन्याच्या आधी ते बुधवारी मैदानावर सराव करत होते. यावेळी मैदानावर अचानकपणे मधमाशांनी एकप्रकारे आक्रमणच केले. पाहता पाहता मैदानावरील वातावरणात सर्वत्र मधमाशाच दिसू लागल्या. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी खेळाडुंना सर्व काही सोडून सरळ मैदानावर लोटांगण घालावे लागले. मधमाशांपासून बचावासाठी सर्व खेळाडू मैदानावर झोपल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाच्या विविध सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी ‘टू बी ऑर नॉट टू बी’ (To bee or not to bee in training was a question yesterday!) अशी सुंदर कॅप्शन देखिल देण्यात आली आहे.

असो या नैसर्गिक संकटातून तर मुंबई इंडियन्सचा संघ सुखरुप बचावला आहे. पण, संघावर जी पराभवाची नामुष्कीचे सतत संटक ओढावत आहे, त्यातून संघ केव्हा बाहेर पडणार याची चिंता मुंबईच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासात मुंबई इंडियन्स हा संघ सर्वाधिक यशस्वी व नेहमी वर्चस्व राखणारा ठरला आहे.

मुंबईच्या संघाने तब्बल ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटाकावण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या नंतर चैन्नई सुपरकिंग्ज संघाचा क्रमांक लागतो. चैन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटावले आहे. पण, या दोन्ही संघाला यंदाच्या हंगामात मात्र मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुबंईने सहा पैकी सहा सामने गमावले आहेत. तर चैन्नईचा ६ पैकी ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना यंदा केवळ एकच विजय मिळवता आला आहे. हे दोन्ही आयपीएल मधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ गुरुवारी एकमेंकाशी भिडणार आहेत. निदान या सामन्यात तरी मुंबईला विजयाची पहिली चव चाखायला मिळणार का? हे पहावे लागेल.

Back to top button