सरकार ७ मिनिटाला विधेयके मंजूर करत आहे, ते काय पापडी चाट आहे का?

पीएम मोदी आणि अमित शहा
पीएम मोदी आणि अमित शहा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार डेरेक ओब्रायन यांनी संसदेत विधेयके झटपट मंजूर करण्यावरून केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.

डेरेक ओब्रायन यांनी व्यंगात्मक पद्धतीने विचारले की 'सरकार पापडी चाट बनवत आहे का? त्यांनी केंद्र सरकारवर संसदेचे पावित्र्य भंग केल्याचा आरोप केला.

सोमवारी, डेरेक ओब्रायन यांनी ट्विटरवर लिहिले की, पहिल्या 10 दिवसात, मोदी आणि शाह जोडीने 12 बिले पास करण्याची गती दाखवली. त्याची सरासरी 7 मिनिट प्रति बिल. त्यांनी लिहिले की, बिल पास करत आहेत की, पापडी चाट तयार करत आहेत?

डेरेक ओब्रायन यांनी आपल्या ट्विटसह संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालेल्या बिलांची यादीही जोडली. या आकडेवारीनुसार, हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडल्यानंतर काही मिनिटांतच मंजूर झाले.

आकडेवारीनुसार, सर्वात वेगवान नारळ विकास मंडळ विधेयक एका मिनिटात मंजूर झाले, तर भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण विधेयक सुमारे 14 मिनिटांमध्ये मंजूर झाले.

2019 मध्ये, टीएमसी खासदार असलेल्या डेरेक ओब्रायन यांनी तिहेरी तलाक विधेयकावर केंद्र सरकारची घाई पाहता, "आम्ही पिझ्झा देत आहोत का" अशी विचारणा केली होती.

टीएमसी खासदार पेगासस हेरगिरी प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करत आहेत.

हे ही वाचलं का?

https://youtu.be/nmrJVXSz3TQ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news