आयपीएलमध्ये सर्वांत लांब सिक्स कोणाचा ? ६ जणांच्या यादीत एक गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर ! | पुढारी

आयपीएलमध्ये सर्वांत लांब सिक्स कोणाचा ? ६ जणांच्या यादीत एक गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर !

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये जलद गतीने धावा करणं फार महत्वपुर्ण असतं. अनेक खेळाडू आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखले देखील जातात. षटकार माऱणाऱ्या खेळाडूंची लोकप्रियताही लगेच वाढत असते. २००८ साली आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक खेळाडूंनी स्टेडियमच्या बाहेरही षटकार लगावले आहेत. एका आयपीएल सिजनमध्ये ६००च्या आसपास षटकार लगावले जातात.

षटकार किती लांब मारला हे मोजण्यासाठी रडार गन किंवा हॉक आय हे तंत्र वापरले जाते. लांब षटाकार मारणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सन्मानित देखील केले जाते. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वांत जास्त षटकार लगावले आहेत. क्रिस गेलनंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये षटकार लगावण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आयपीएलमध्ये सर्वांत लांब षटकार एल्बी मॉर्कलने लगावला आहे. त्याने १२५ मीटरचा षटकार लगावला होता. लांब षटकार लगावण्याच्या यादीत गोलंदाज प्रविण कुमारचा देखील समावेश आहे. त्याने १२४ मीटरचा षटकार लगावला होता.

कोणी किती मीटरचा षटकार लगावला पाहुया

  • एल्बी मॉर्कल           – १२५ मीटर
  • प्रविण कुमार           – १२४ मीटर
  • अॅडम गिलख्रिस्ट    – १२२ मीटर
  • रॉबिन उथ्थपा          – १२० मीटर
  • रॉस टेलर                – ११९ मीटर
  • ख्रिस गेल                – ११९ मीटर

हेही वाचलतं का?

Back to top button