MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्‍या नावावर ‘या’ विक्रमाची नोंद | पुढारी

MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्‍या नावावर 'या' विक्रमाची नोंद

पुढारी; ऑनलाईन डेस्‍क : आयपीएलमधील चेन्‍नई सुपरकिंग संघाचा सर्वेसर्वा अशी ओळख बनलेल्‍या महेंद्रसिंह धोनी याच्‍या नावावर एका अनोख्‍या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा पाठोपाठ त्‍याने हा पराक्रम केला आहे. ( MS Dhoni IPL 2022 )

MS Dhoni IPL 2022 : सर्वाधिक सामने खेळण्‍याचा विक्रम रोहित शर्माच्‍या नावावर

महेंद्रसिंह धोनी हा पंजाब किंग्‍जविरोधात आज मैदानात उतरणार आहे. टी-२० मधील त्‍यांचा आजचा ३५० वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी रोहित शर्मा याच्‍या नावावर नोंद होती. रोहितने आजपर्यंत ३७२ टी-२० सामने खेळले आहेत.

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्‍यानंतर सर्वाधिक टी-२० सामने खेळणार्‍या भारतीय खेळाडूमध्‍ये सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि विराट कोहली यांचा क्रमांक लागतो. या तिघांनी आतापर्यंत अनुक्रमे ३३६, ३२९ आणि ३२८ सामने खेळले आहेत.

महेंद्रसिंह याने टी-२०मधील सात हजार धावा पूर्ण केल्‍या आहेत. यामध्‍येत्‍याच्‍या नावावर एकही शतक नाही. तर २८ अर्धशतकी खेळी केली आहे.

हेही वाचलं का ?

 

 

 

Back to top button