महिला क्रिकेट विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाची माेहर, इंग्‍लंड उपविजेता | पुढारी

महिला क्रिकेट विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाची माेहर, इंग्‍लंड उपविजेता

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत सातव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी १९७८, १९८२, १९८८, २००५ आणि २०१३ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत सातव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर ३५७ धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडचा संघ २८५ धावांपर्यंतचं मजल मारू शकला.  इंग्लंडचा विश्वचषकाच्या फायनलमधील हा चौथा पराभव आहे.

मोठ्या धावसंख्येसमोर इंग्लंडचा संघ गारद

आजच्या फायनल सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ३५७ धावांचे डाेंगर उभारला. इंग्लंडला सुरुवात खराब झाली.  वैय पवेलियन ४ धावा करत स्वस्तात माघारी परतली. इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटही चांगली कामगिरी करु शकली नाही. ८६ धावांमध्‍ये इंग्लंडने ३ विकेट्स गमावल्या. नटाली स्कीवरने शतक झळकावत शेवटपर्यंत झुंज दिली. इंग्लंडचा संघ ४३.४ षटकांत सर्वबाद २८५ धावांपर्यंत मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियाकडून किंग आणि जॉनसने प्रत्येकी ३-३ विकेट्स पटकावल्या. स्कटने २ तर गार्डनर आणि मॅकग्राथने प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.

नटाली स्कीवरची खेळी व्यर्थ

इंग्लंडकडून नटाली स्कीवरने १२१ चेंडूंमध्ये १४८ धावा करत दमदार शतक झळकावले. नटाली हिने १५ चौकार आणि १ षटकार लगावला. स्कीवर इंग्लंडला विजयाकडे घेऊन जात होती, मात्र तिला कोणाचीही साथ मिळाली नाही.  विश्वचषक फायनलमध्ये तिसरी माेठी खेळी तिच्‍या नावावर नाेंदली गेली.

हेही वाचलंत का?

Back to top button