पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्‍यावर इम्रान खान समर्थकाचा लंडनमध्‍ये हल्‍ला | पुढारी

पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्‍यावर इम्रान खान समर्थकाचा लंडनमध्‍ये हल्‍ला

लंडन : पुढारी ऑनलाईन
पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्‍यावर हल्‍ला झाल्‍याची माहिती पाकिस्‍तानमधील पत्रकार अहमद नुरानी यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली आहे. इम्रान खान यांच्‍या पक्ष तहरीक-ए-इन्‍साफच्‍या कार्यकर्त्याने हे कृत्‍य केले असून, यामध्‍ये शरीफ यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. दरम्‍यान, इम्रान खान यांच्‍यावरील अविश्‍वास प्रस्‍तावापूर्वी एक दिवसआधी हा हल्‍ला झाल्‍याने खळबळ उडाली.

या घटनेबाबत बोलताना नवाझ शरीफ यांच्‍या कन्‍या मरियम यांनी सांगितले की,पाकिस्‍तानमधील सत्ताधारी पक्ष हा हिंसाचाराचे समर्थन करत आहे. अशा पक्षाच्‍या नेत्‍यांना अटक करण्‍यात यावी. इम्रान खान यांच्‍यावरही देशद्रोहचा गुन्‍हा दाखल करण्‍यात यावी, अशी मागणी
त्‍यांनी केली.

हेही वाचलं का?

 

Back to top button