IPL च्या पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणाऱ्या राजपक्षाला घ्यायचा आहे 'क्रिकेटच्या रोनाल्डो'कडून सल्ला | पुढारी

IPL च्या पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणाऱ्या राजपक्षाला घ्यायचा आहे 'क्रिकेटच्या रोनाल्डो'कडून सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या (IPL 22) पहिल्याच सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या भनुका राजपक्षा याने फिटनेससाठी कोणत्या भारतीय खेळाडूचा सल्ला घ्यायचा हे सांगितले आहे. श्रीलंकेचा फलंदाज भनुका राजपक्षा असे मानतो की खेळाडूसाठी कौशल्यासोबत फिटनेसही महत्वाची गोष्ट आहे. फिटनेसशिवाय आधुनिक युगाच्या क्रिकेटमध्ये टिकून राहणे शक्य नाही असे त्याला वाटते. फिटनेसच्या समस्येमुळे राष्ट्रीय संघातून वगळलेल्या राजपक्षाला आता भारतीय क्रिकेट संघात नेहमी फिट राहणाऱ्या विराट कोहलीकडून सल्ला घ्यायचा आहे. भनुका राजपक्षा विराटला ‘क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो’ मानतो. भनुका राजपक्षाने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळूर विरुद्ध ४३ धावांची चांगली खेळली होती. (IPL 22)

३० वर्षीय राजपक्षाने यांनी जानेवारी २०२२ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, यानंतर अधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव एका आठवड्यानंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. मात्र, फिट नसल्यामुळे त्याला भारतविरूद्धच्या दौऱ्यात श्रीलंकन संघात स्थान दिले नव्हते. आयपीएलच्या माध्यमातून त्याला नेहमी फिट असणाऱ्या भारताच्या माजी कर्णधाराला भेटण्याची संधी मिळू शकते आणि त्याचा त्याला फिटनेस संदर्भात फायदा होईल असे त्याला वाटत आहे.

राजपक्षाला खात्री आहे की आयपीएल दरम्यान पंजाब किंग्जसोबत दोन महिने राहिल्याने त्याच्या खेळाला खूप होईल आणि त्याचा फिटनेस अधिक उत्तम होईल. राजपक्षाने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. येथे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्याकडून खेळाबद्दल खूप काही शिकायला मिळते म्हणून मी शिखर धवनकडून काही गोष्टी शिकत आहे. अंडर-१९ मध्ये एकत्र खेळल्यामुळे मआंक आग्रवाल आणि माझे चांगले संबंध आहेत.

विराट कोहली अशी व्यक्ती आहे ज्याच्याशी मी मनमोकळे करून बोलू शकतो आणि फिटनेसबद्दल तो मला सल्ला देऊ शकतो. त्याचा फिटनेस उत्तम आहे. राजपक्षा म्हणाला, माझ्यासाठी विराट कोहली क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. कारण, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वत:ला नेहमी तंदुरूस्त ठेवत असतो. म्हणून राजपक्षा विराट कोहलीला क्रिकेटमधील रोनाल़्डो मानतो.

Back to top button