OnePlus 10 Pro आज भारतात होणार लाँच; 'हे' आहेत भन्नाट फिचर्स | पुढारी

OnePlus 10 Pro आज भारतात होणार लाँच; 'हे' आहेत भन्नाट फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : OnePlus 10 Pro स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होत आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर अशी भन्नाट फीचर्स आहेत. यासोबत याच कंपनीचे OnePlus Bullets Wireless Z2 हा देखील आज भारतात लॉन्च होत आहे. OnePlus 10 Pro हा OnePlus Bullets Wireless Z2 च्या पुढचे व्हर्जन आहे. याशिवाय आजच्या इव्हेंटमध्ये OnePlus Buds Pro रेडियंट सिल्व्हर कलर हे  मॉडेल देखील लॉन्च केले जात आहे.

OnePlus 10 Pro चे लॉन्चिंग आज सायंकाळी 7:30 वाजता हाेणार आहे. याचे सोशल मीडियावर थेट प्रसारित हाेईल. भारतासह जगभरात, OnePlus 10 Pro चे जागतिक लॉन्चिंगदेखील आजच होणार आहे.

OnePlus 10 Pro ची भारतातील किंमत

भारतात OnePlus 10 Pro ची किंमत 66,999 रुपयांपासून 71,999 पर्यंत असणार आहे. हा स्मार्टफोन 5 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 फीचर्स

OnePlus 10 Pro मध्ये खास वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा स्मार्टफोन चाहत्यांना आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD + (1,440×3,216 पिक्सेल) कव्हर LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरही आहे. 12GB पर्यंत LPDDR5 RAM यामध्ये असणार आहे. वनप्लस 10 प्रो ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात f/1.8 लेन्ससह 48-मेगापिक्सेल Sony IMX789 प्राथमिक सेन्सर, 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो शूटर आहे. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. 5G, Wi-Fi 6 आणि NFC सह कनेक्टिव्हिटी पर्यायांची संपूर्ण श्रेणी आहे. OnePlus 10 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 80W वायर्ड आणि 50W चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसचे वजन 200.5 ग्रॅम आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button