अतनु दास याच्या यशात पत्नी दिपीकाकुमारीचा मोलाचा वाटा | पुढारी

अतनु दास याच्या यशात पत्नी दिपीकाकुमारीचा मोलाचा वाटा

टोकियो : पुढारी ऑनलाईन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा आर्चर अतनु दास याने ३२ व्या फेरीत दक्षिण कोरियाचा दिग्गज आर्चर जीन हेक याचा पराभव केला. जीन हेक याने लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पण, अतनु दासने त्याला मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत मात दिली.

अतनु दासच्या या विजयात त्याच्या पत्नीचा मोठा वाटा राहिला. टोकियो ऑलिम्पिकमधील युमेनोशिमा पार्कवर ज्यावेळी पुरुष एकेरी रेक्युरव्ह प्रकारातील अंतिम ३२ ची फेरी सुरु होती. यावेळी मैदानात सर्वत्र शांतता होती. कोणत्याच देशाचे पाठीराखे आणि त्यांचा प्रोत्साहनपर गोंगाट नव्हता.

पत्नीचा जोरदार पाठिंबा

अशा परिस्थिीत अतनु दासची पत्नी स्टँडमध्ये आली. अतनु दास या ऑलिम्पिकमध्ये अनेक पदके जिंकेल्या जीनबरोबरच्या सामन्यात पिछाडीवर पडला होता.

पण, अतुन दासची पत्नी स्टँडमधून त्याला प्रोत्साहन देत होती. अखेर सामन्याचा मोक्याचा क्षण आला. जीनने पहिल्यांदा बाण दागला.

जीनच्या या शॉटने ९ गुणांचा वेध घेतला. आता अतनु दासवर प्रचंड दबाव होता. या अटीतटीच्या सामन्याचा निकाल त्याच्या शेवटच्या शॉटवर अवलंबून होता. स्टँडमधून आवाज येत होता.

अतनु दासने आपला बाण सोडला. बुल्स आय या बाणाने सर्वोच्च १० गुणांचा वेध घेतला. याचबरोबर जीनचे वैयक्तिक प्रकारात दुसरे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

आर्चरीतील स्टार नवरा बायको जोडी

स्टँडमधून आवाज आला ‘गुड जॉब कॉन्फिडन्स’ हा आवाज होता जागतिक क्रमवारीत महिला आर्चरीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या दिपीकाकुमारीचा. होय दिपीकाकुमारी अतनु दासची पत्नी आहे.

दासने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘मी तिचा आवाज कायम ऐकत होतो, तिने मला चांगला पाठिंबा दिला. तिने मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले.’

ऑलिम्पिकध्ये वेगवेगळ्या खोलीत राहतात

अतनु दास याने सांगितले की दिपीका ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये वेगळ्या खोलीत राहते. आम्ही फक्त सरावाच्या वेळी एकत्र येतो.

दिपीकाही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत आहे. तीने महिला एकेरी आर्चरीची अंतिम १६ ची फेरी गाठली आहे.

अतनु दास म्हणाला, मी मिश्र प्रकारात अपेक्षा ठेवून होतो. पण, दुर्दैवाने आम्ही हरलो. अतनु दास आता पुरुष एकेरीमध्ये जपानच्या ताकाहारू फुरुकावा याच्याबरोबर शनिवारी भिडणार आहे. हा सामना उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी होणार आहे.

दरम्यान, अतनु दास म्हणाला ‘माझा भारताला एक संदेश आहे. आमच्यासाठी प्रार्थना करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. आम्ही आमच्या परीने सर्वस्व पणाला लावून खेळत आहे. आम्ही पुढची फेरी गाठणार.’

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : कराळे मास्तर भरतोय रोज २०० गरिबांची पोटं

Back to top button