Swiss Open Badminton : पी व्‍ही सिंधू आणि प्रणॉय यांची सेमीफायनलमध्‍ये धडक, मिश्रमध्‍ये पोनप्‍पा-सिक्‍कीचा पराभव | पुढारी

Swiss Open Badminton : पी व्‍ही सिंधू आणि प्रणॉय यांची सेमीफायनलमध्‍ये धडक, मिश्रमध्‍ये पोनप्‍पा-सिक्‍कीचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍विस ओपन बॅडमिंटन स्‍पर्धेत भारतीय खेळाडूची दमदार वाटचाल सुरु आहे. ( Swiss Open Badminton ) दोनवेळा ऑलिम्‍पिक विजेता पी. व्‍ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी सेमीफायनलमध्‍ये धडक मारली. आता सेमिफायनलमध्‍ये सिंधूचा सामना थायलंडच्‍या सुपानिदा कॅतेथोंग हिचा हिच्‍याशी होईल. तर प्रणॉय याच्‍यासमाेर इंडोनेशियाच्‍या ॲथोनी सिनिुसका जिंटिग याचे आव्‍हान असणार आहे.

महिला एकेरीमध्‍ये सिंधूने कॅनडाच्‍या पाचव्‍या नामांकित मिशेले लिचा सहज पराभव केला. तिने ३६ मिनिटांमध्‍ये २१-१०, २१-१९ असा सलग दोन सेटमध्‍ये मिशेलेचा पराभव केला. प्रणॉय याने राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील सुर्वण पदक विजेता पारुपल्‍ली कश्‍यप याचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला.

Swiss Open Badminton : सिंधूचा दिमाखदार विजय

सिंधूने क्‍वार्टर फायनलमध्‍ये आपल्‍या उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन केले. सामना सुरु झाल्‍यानंतर पहिल्‍या सेटमध्‍ये दोन्‍ही खेळाडूंनी प्रत्‍येक तीन गूण घेतले. यानंतर सिंधुने सलग सात गूण आपल्‍या नावावर केले. दुसर्‍या गेममध्‍ये ती सुरुवातील पिछाडीवर होती. मात्र यानंतर तिने कमबॅक करत सामना २१-१९ असा आपल्‍या नावावर केला.

मिश्रमध्‍ये पोनन्‍पा-रेड्‍डी पराभूत

स्‍विस ओपनच्‍या मिश्रमध्‍ये अश्‍विनी पोनन्‍पा आणि एन सिक्‍की रेड्‍डी या दोघांकडून मोठ्या अपेक्षा होत्‍या. मात्र दुसर्‍या फेरीत या जोडीने निराशा केली. मलेशियाच्‍या कि व्‍हियन हू आणि चियू सियेन किम यांनी त्‍यांचा पराभव केला.

हेही वाचलं का? 

 

Back to top button