Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने तोडला कपिलदेवचा विक्रम | पुढारी

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने तोडला कपिलदेवचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
रवींद्र जडेजाच्‍या ( Ravindra Jadeja ) धडाकेबाज फलंदाजीमुळे श्रीलंकेविरुद्‍धच्‍या कसोटी सामन्‍यात भारताने धावांचा डोंगर उभारला. त्‍याने नाबाद १७५ धावांची खेळी केली. या खेळीने ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. त्‍याचबरोबर सातव्‍या क्रमाकांवर फलंदाजीला येवून तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Ravindra Jadeja : ३५ वर्षांपूर्वींचा विक्रम मोडला

कपिल देव यांनी १९८६ मध्‍ये कानपूरमध्‍ये श्रीलंकेविरुद्‍धच्‍या कसोटी सामन्‍यात १६३ धावांची खेळी केली होती. त्‍या सामन्‍यातही कपिल देव हा सातव्‍या क्रमांकावरच फलंदाजीसाठी आला होता. श्रीलंकेविरुद्‍धच्‍या पहिल्‍या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकारली. जडेजाने १६० चेंडूत आपलं शतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा ५१ चेंडूत पूर्ण केल्‍या.

रवींद्र जडेजाने आपल्‍या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत नाबाद १७५ धावांची खेळी केली. भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. जडेजाचे हे दुसरे कसोटी शतक ठरले. या खेळीत त्‍याने १७ चौकारांसह ३ षटकार लगावत आपल्‍या कसोटी कारकीर्दीतील
उ्‍च्‍चांकी धावा केल्‍या.

हेही वाचलं का?

Back to top button