एक खेळाडू जखमी झाल्याने एकाचवेळी टीम इंडिया आणि मुंबईची चिंता वाढली ! | पुढारी

एक खेळाडू जखमी झाल्याने एकाचवेळी टीम इंडिया आणि मुंबईची चिंता वाढली !

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आपल्या खिशात घातली आहे. काल झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. परंतु ह्या सामनात भारताची चिंता वाढवणारी एक घटना घडली आहे. भारताचा युवा खेळाडू ईशान किशनला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.(INDvsSL)

श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू इशान किशनच्या हेलमेटवर आदळला कुमाराने टाकलेला चेंडू ताशी १४७ KMPH वेगाने टाकलेल्या चेंडूवर ईशान पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसल्यामुळे चेंडू थेट ईशान किशनच्या हेलमेटवर आदळला. ईशानच्या डोक्याला चेंडूचा मार लागला असावा यामुळे डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आले.

ईशान किशनला अधिक उपचारासाठी कांगडाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईशानला जोरात चेंडू लागल्याचं लक्षात येताच मदतीसाठी श्रीलंकेचे खेळाडू धावले. सामन्या दरम्यान ईशानच्या डोक्यावर चेंडू आदळल्यानंतर ईशान काळासाठी जमिनीवर बसला होता. सामन्यात घातलेल्या हेल्मेटमुळे ईशानला गंभीर दुखापत झाली नाही.(INDvsSL)

INDvsSL

मै झुकेगा नाही म्हणत केली पुन्हा फलंदाजीस सुरूवात

ताशी १४७ च्या वेगाने आलेला चेंडू थेट ईशानच्या हेलमेटवर जाऊन आदळला. यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी धाव घेत त्याची विचारपूस केली. त्यानंतर भारतीय संघाची वैद्यकीय टीम ईशानची तपासणी करण्यासाठी आले. त्यावेळी तपासणी करून ईशानला मैदान सोडण्याचा सल्ला दिला परंतु या युवा खेळाडूने मै झुकेगा नही म्हणत फलंदाजीस पुन्हा सुरूवात केली.

श्रीलंकेचा खेळाडूही हॉस्पिटलमध्ये दाखल

ईशान किशनशिवाय श्रीलंकेच्या दीनेश चंडीमललाही या खेळाडूला सामन्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याला ही फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईशानच्या डोक्याच सीटी स्कॅन करण्यात आलं आहे. पण त्यात गंभीर दुखापत झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. खबरदारीच पाऊल म्हणून दोघांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

फोर्टिस हॉस्पिटलभोवती कडेकोट सुरक्षा कवच

आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन खेळाडू फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने रुग्णालयाभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीसीसीआयने या संदर्भात अधिकृतपणे कुठलीही माहिती दिलेली नाही. ईशानची तब्येत ठीक आहे. काही काळानंतर त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली जाईल. किशनने मागच्या सामन्यात 89 धावांची शानदार फलंदाजी केली होती. यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी ईशानला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागणार आहे. तर ईशानवर यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक बोली लावण्यात आली होती.

Back to top button