Kohli 100th Test Match : विराट प्रेक्षकांशिवाय खेळणार १०० वा कसोटी सामना

Kohli 100th Test Match : विराट प्रेक्षकांशिवाय खेळणार १०० वा कसोटी सामना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका (INDvsSL) यांच्यातील पहिला कसोटी सामना 4 मार्च रोजी मोहाली येथे खेळवला जाईल. जो विराट कोहलीच्या ( Kohli 100th Test Match ) कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. मार्चला होणारा हा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे, म्हणजेच चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सीईओ दीपक शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, "भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय स्टेडियममध्ये खेळवला जाईल."

भारत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळणार आहे आणि दुसरा कसोटी सामना बेंगळुरूच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. विराट कोहली ( Kohli 100th Test Match ) आपला 100 वा कसोटी सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा प्रथमच कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करत आहे. कोहलीने 99 कसोटी सामन्यात 50.39 च्या सरासरीने 7962 धावा केल्या आहेत, ज्यात त्याच्या नावावर 27 शतके आहेत.

सध्या विराट कोहली ( Kohli 100th Test Match ) श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका खेळत नाही, त्याला बायोबबलमधून ब्रेक देण्यात आला आहे. कोहलीशिवाय पंत देखिल टी-20 मालिकेचा भाग नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माला भारताचा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित आता तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करेल.

कोहली यापुढे आयपीएलमध्ये देखिल कर्णधार असणार नाही. कोहलीने यापूर्वी म्हटले होते की, टी-२० विश्वचषक ही माझी भारताचा कर्णधार म्हणून सर्वात लहान स्वरूपातील शेवटची स्पर्धा असेल. यानंतर त्याने आयपीएलचे कर्णधारपद सोडण्याची घोषणाही केली होती. यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.

आरसीबीचे कर्णधारपद सोडताना कोहली 'द आरसीबी पॉडकास्ट' वर म्हणाला, "मी अशा लोकांपैकी नाही ज्यांना गोष्टी रोखून ठेवायच्या आहेत. जरी मला माहित आहे, की मी खूप काही करू शकतो, परंतु जर मला प्रक्रियेचा आनंद मिळत नसेल तर मी ते काम करणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news