Women’s World Cup 2022 : वनडे विश्वचषकसाठी हरमनप्रीत कौर भारताची उपकर्णधार

Women’s World Cup 2022 : वनडे विश्वचषकसाठी हरमनप्रीत कौर भारताची उपकर्णधार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Women's World Cup 2022 : आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेली भारताची क्रिकेट खेळाडू हरमनप्रीत कौर महिला वनडे विश्वचषक २०२२ मध्ये उपकर्णधार असेल. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मिताली राजने शनिवारी याची पुष्टी केली. महिला वनडे विश्वचषक २०२२ मध्ये (Women's World Cup 2022) हरमनप्रीत भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दीप्ती शर्मा भारतीय संघाची उपकर्णधार होती.

हरमनप्रीत कौर न्यूझीलंडविरुद्ध चौथा सामना खेळू शकली नव्हती, ती पाचव्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ती मैदानात उतरली होती. मात्र, गेल्या काही सामन्यात हरमनप्रीतने पुनरागमन केल्यानंतरही संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारी दीप्ती शर्माकडे होती. यावेळी, व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मिताली राजने सांगितले की, "दिप्ती दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची उपकर्णधार होती. हा निर्णय संघ निवडकर्त्यांचा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) होता. परंतु आता हरमनप्रीतला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

कर्णधार मिताली राज, सलामीवीर स्मृती मानधना आणि फॉर्ममध्ये परतलेल्या तिन्ही अनुभवी फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने न्यूझीलंज विरूध्दच्या पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या महिला वनडे सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला होता. या शेवटच्या सामन्याात विजय मिळवून भारतीय संघ क्लीन स्वीप होता होता वाचला होता. शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्याने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिला विजय नोंदवला. मागील सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनीही अखेरच्या सामन्यात चांगली कामगिरी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news