INDvsSL T20 : भारताचा मालिका विजय, श्रीलंकेवर ७ गडी राखून मात | पुढारी

INDvsSL T20 : भारताचा मालिका विजय, श्रीलंकेवर ७ गडी राखून मात

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सने पराभव केला. विजयासाठी 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 17.1 षटकात 3 गडी गमावून 186 धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद 74 (44 चेंडू) आणि रवींद्र जडेजाने नाबाद 45 (18 चेंडू) धावा केल्या. संजू सॅमसनने 39 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा हा सलग 11 वा विजय आहे. भारताने घरच्या भूमीवर T 20 मध्ये सलग सातवी मालिका जिंकली आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 5 गडी गमावून 183 धावा केल्या. भारताला हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 184 धावा कराव्या लागतील. श्रीलंकेकडून पथुम निसांका (75) याने सर्वाधिक धावा केल्या तर कर्णधार दाशून शनाकाने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करताना 19 चेंडूत 47 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 बळी घेतला. श्रीलंकेने शेवटच्या 5 षटकात 80 धावा वसूल केल्या.

संजू सॅमसनची फटकेबाजी…

मालिकेत पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने लाहिरू कुमाराच्या तिसऱ्या षटकात आक्रमक फॉर्म दाखवला. त्याने तीन षटकार आणि एका चौकारासह एकूण २३ धावा वसूल केल्या. मात्र ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सॅमसनने जोरदार शॉट खेळला, पण स्लीपमध्ये बिनुरा फर्नांडोच्या हाती झेलबाद झाला. सॅमसनने २५ चेंडूत ३९ धावा केल्या.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

श्रीलंकेविरुद्ध श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी सुरूच आहे. त्याने 30 चेंडूत अर्धशतक केले. आतापर्यंत त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील हे पाचवे अर्धशतक आहे.

इशान किशन बाद..

भारताची सलामी जोडी यावेळी विशेष काही करू शकली नाही. रोहितपाठोपाठ इशान किशनही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला शनाकाने लाहिरू कुमारा करवी 15 धावांवर झेलबाद केले.

श्रेयसची चौकारांची हॅट्ट्रिक

श्रेयस अय्यरने बिनुरा फर्नांडोच्या षटकात लागोपाठ तीन चौकार मारत 14 धावा वसूल केल्या.

श्रीलंकेच्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला दुष्मंता चमीराने क्लिन बोल्ड केले. रोहितने केवळ १ धाव केली.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने दमदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. मात्र, दनुष्का गुणातिलका बाद होताच संघ संकटात सापडला. त्यानंतर एकामागून एक चार विकेट 102 धावांत गमावल्या. मात्र, यानंतर पथुम निसांका आणि दशून शनाका यांनी झटपट धावा करत ५८ धावांची भागीदारी केली. दोघांनी शेवटच्या पाच षटकात 80 धावा कुटल्या.

भारताकडून युजवेंद्र चहलने 16व्या षटकात 8, हर्षल पटेल 17व्या षटकात 19, जसप्रीत बुमराहने 18व्या षटकात 14, भुवनेश्वर कुमारने 19व्या षटकात 16 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकात हर्षलने 23 धावा दिल्या. अशाप्रकारे भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 30 चेंडूत 80 धावा दिल्या. यामध्ये एकट्या हर्षल पटेलने 42 धावा दिल्या. भारतासाठी हर्षल पटेल हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत एका विकेटसह 52 धावा दिल्या.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर श्रीलंकेने संघात २ बदल केले आहेत. दुसऱ्या टी-२० मध्ये पावसामुळे खेळाची मजा खराब होऊ शकते. धर्मशाळेतही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी आणि दिवसभरही पाऊस झाला.

निशांकाचे अर्धशतक

पथुम निसांकाने शानदार फलंदाजी करत ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाची सुरुवात करताना त्याने अतिशय संयमी खेळी खेळली. तसेच त्याचे टी-२० कारकिर्दीतील हे पाचवे अर्धशतक आहे.

बुमराहला पहिली विकेट

जसप्रीत बुमराहला दुसऱ्या स्पेलमध्ये पुनरागमन करताना विकेट मिळाली. त्याने तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दिनेश चंडिमलला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.

हर्षलचे पहिले यश

हर्षल पटेलने पहिल्या षटकात १० धावा देत शानदार पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या षटकात केवळ पाच धावांवर कामिल मिशारा याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले.

युझवेंद्र चहलने मागील सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या चरिथ अस्लंकाची विकेट घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. चहलने तिसर्‍या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अस्लंकाला दोन धावांवर एलबीडब्ल्यू केले. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ७१ होती.

रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या दुसऱ्या षटकात लंकेने १८ धावा वसूल केल्या. पहिल्या तीन चेंडूत १६ धावा दिल्यानंतर जडेजाने दनुष्का गुणातिलकाला व्यंकटेशकरवी झेलबाद केले. दनुष्काने ३८ धावा केल्या.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

श्रीलंका संघ :

पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, दनुष्का गुणतिलक

Back to top button