IPL Auction 2022 : हर्षल पटेल मालामाल! RCB ने पुन्हा संघात घेत मोजले १०.७५ कोटी

IPL Auction 2022 : हर्षल पटेल मालामाल! RCB ने पुन्हा संघात घेत मोजले १०.७५ कोटी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

IPL Auction 2022 : वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला (Harshal Patel) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) १०.७५ कोटी रुपयांना परत घेतले आहे. त्याची बेस प्राइज २ कोटी होती. हर्षल सुरुवातीला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. त्यानंतर त्याला आरसीबीने आपल्याकडे घेतले. गेल्या वर्षी हर्षलने चांगली कामगिरी केली होती. त्याने २०२१ मधील आयपीएल हंगामात ३२ विकेट घेतल्या होत्या. त्याला पर्पल कॅप मिळाली होती. आता त्याला पुन्हा आरसीबीने आपल्याकडे घेतले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७८ विकेट घेतल्या आहेत. २७ धावांत पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हर्षल (Harshal Patel) आयपीएल २०२१ मधील हंगामात सर्वांधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आरसीबीने (Royal Challengers Bangalore) त्याला रिलीज केले होते. पण २०२२ मधील लिलावादरम्यान त्याला पुन्हा RCBने संघात घेतले आहे.

दरम्यान, वेस्टविंडीज दिग्गज ऑलराउंडर जेसन होल्डरला (Jason Holder) लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) ८.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. नितीश राणाला केकेआरने ८ कोटींना विकत घेतले आहे. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला Rajasthan Royals ने ७.७५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

इंडियन प्रीमअर लीगच्‍या (IPL Auction 2022) महालिलाव सुरु असून ( IPL Auction Updates) आज आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेल्‍या खेळाडू हा श्रेयस अय्‍यर ठरला आहे. श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्‍बल १२.२५ कोटी रुपयला खरेदी केले आहे. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सला नवा कर्णधार मिळाला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज श्रेयस अय्यर याला आज सर्वाधिक बोली लागली. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडावर मोठी बोली लागली. त्याला पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं.

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन याच्यासाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे. तर आर अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news