Live : #TATAIPLAuction दीपक चाहरला १४ कोटी तर ईशान किशनसाठी १५.२५ कोटींची बाेली  | पुढारी

Live : #TATAIPLAuction दीपक चाहरला १४ कोटी तर ईशान किशनसाठी १५.२५ कोटींची बाेली 

पुढारी ऑनलाईन डेस्क

#TATAIPLAuction : इंडियन प्रीमिअर लीगचा (#TATAIPLAuction) महालिलाव आज शनिवारी सकाळी ११ वाजता सुरु झाला.दीपक चाहरला १४ कोटी तर ईशान किशनसाठी १५.२५ कोटींला दीपक चाहरसाठी चेन्‍नई सुपरकिंग्‍जने १४ कोटी मोजले. तर मुंबई इंडियन्‍सने ईशान किशनला १५.२५ कोटीला खरेदी केले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज श्रेयस अय्यर याला  कोलकाता नाइट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडावर मोठी बोली लागली. त्याला पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं.

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन याच्यासाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे. तर आर अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंटस् हे नवीन संघ आल्याने दहा संघांचा दोनदिवसीय लिलावात समावेश आहे. लिलावात ५९० क्रिकेटपटूंवर बोली लागेल, ज्यामध्ये २२७ विदेशी खेळाडू आहेत. यावर्षी दहाहून अधिक खेळाडूंवर दहा कोटींहून अधिकची बोली लागू शकते आणि काही खेळाडू २० कोटींच्या आसपास जाऊ शकतात.

#TATAIPLAuction : पहा लाइव्ह अपडेट्स…

हर्षल पटेल साठी आरसीबी ने मोजले १०.७५ कोटी रूपये

दक्षिण आफ्रिकेच्या रबाडावर मोठी बोली, पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं

गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीसाठी मोजले ६.२५ कोटी रूपये. आयपीएल २०२२ मध्ये मोहम्मद शमी गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिसेल. 

लखनऊच्या टीमने क्विंटन डिकॉकसाठी मोजले ६.७५ कोटी रूपये

दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरसाठी मोजले ६.२५ कोटी रूपये

आरसीबी ने फॅफ डुप्लेसीस साठी मोजले ७ कोटी रूपये

कोलकत्ता नाईट राईडर्स ने श्रेयस अय्यरसाठी मोजले १२.२५ कोटी रूपये 

पंजाब किंग्ज ने कगिसो रबाडासाठी मोजले ९.२५ कोटी रूपये

राजस्थान रॉयल्स ने ट्रेंट बोल्टसाठी मोजले ८ कोटी रूपये

लखनऊ सुपर जायन्ट्स ने मनीष पांडे साठी मोजले ४.६० कोटी रुपये मोजले

शेमरॉन हेटमायर आता खेळणार राजस्थान रॉयल्ससाठी, राजस्थान रॉयल्सने मोजले ८.५० कोटी रूपये

रॉबिन उत्तपासाठी चेन्नई सुपर किंग्जने मोजले २ कोटी रुपये, त्याचा बेस प्राईजही २ कोटी रूपये इतकीच होती
जेसन रॉय साठी गुजरात टायटन्स ने मोजले २ कोटी रूपये

डेव्हिड मिलर यावर्षी राहिला अनसोल्ड

देवदत्त पडिकल साठी राजस्थान रॉयल्स ने मोजले ७.७० कोटी रूपये

शकिब अल हसन यावर्षीच्या आयपीएल च्या ऑक्शन मध्ये अनसोल्ड राहिला आहे.

नितेश राणासाठी कोलकत्ता नाईट रायडर्स ने मोजले ८ कोटी रूपये

जेसन होल्डर साठी लखनऊ जायन्टस ने मोजले ८.७५ कोटी रूपये

 

Image

Image

Back to top button