

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमध्ये सुरू असलेल्या आयपीएलचा महालिलाव सुरु सुरू आहे. यात शिखर धवनसाठी पंजाब किंग्जकडून ८.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. शिखर धवनची बेस प्राईस ही २ कोटी रूपये इतकी होती. तर आर. अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजले आहेत. आर अश्विनची बेस प्राईज देखील २ कोटी रूपये इतकीच होती. (IPL Auction)
हा लिलाव मोठा असल्याने संघांना कमीत कमी 18 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू (कॅप आणि अनकॅप) यांना मागणी अधिक असेल. त्यामुळेच गेल्यावर्षी 'पर्पल कॅप' जिंकणार्या हर्षल पटेलची आधारभूत किंमत दोन कोटी आहे. या रकमेच्या पाच पट किंमत त्याला मिळू शकते.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंटस् हे नवीन संघ आल्याने दहा संघांचा दोनदिवसीय लिलावात समावेश आहे. लिलावात 590 क्रिकेटपटूंवर बोली लागेल, ज्यामध्ये 227 विदेशी खेळाडू आहेत.