Sunil Gavaskar : २०२३ क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी सुनील गावस्‍करांनी दिला 'हा' सल्‍ला | पुढारी

Sunil Gavaskar : २०२३ क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी सुनील गावस्‍करांनी दिला 'हा' सल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्‍कर ( Sunil Gavaskar ) यांनी २०२३ विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वी टीम इंडियामध्‍ये कोणता बदल करावा, यासंदर्भात एक सूचना केली आहे. २०२३ विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याचा प्रभाव पडणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Sunil Gavaskar : भुवनेश्‍वर कुमारऐवजी दीपक चाहर याला संधी द्‍यावी

एका वृत्तसंस्‍थेची बोलताना गावस्‍कर म्‍हणाले, पुढील वर्षी आयसीसीच्‍या एक दिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धा भारतात होणार आहे. या स्‍पर्धेत वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारऐवजी दीपक चाहर याला संधी द्‍यावी. दीपक चाहर हा तरुण वेगावन गोलंदाज आहे. त्‍याचबरोबर तो एक उत्‍कृष्‍ट अष्‍टपैलू खेळाडूही आहे. मध्‍य फळीत त्‍याची फलंदाजी संघाला मजबूत स्‍थितीत घेवून जाण्‍यास फायदेशीर ठरु शकेल, असेही मत त्‍यांनी नोंदवले.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कसोटी पाठोपाठ वन डे मालिकेतही टीम इंडियाचा नामुष्‍कीजनक पराभव झाला आहे. वन डेमधील दोन सामन्‍यात भुवनेश्‍वर कुमारने अुनक्रमे ६४ आणि ६७ धावा दिल्‍या. या दोन्‍ही सामन्‍यात एकही बळी घेण्‍यात भुवनेश्‍वर कुमार याला यश आलेले नाही. त्‍यामुळे आता वेगावन गोलंदाज म्‍हणून भुवनेश्‍वर कुमारला बाहेर सस्‍ता दाखवावा, असेही त्‍यांनी सूचवला आहे.,
भुवनेश्‍वर कुमार हा अत्‍यंत प्रतिभावंत वेगवान गोलंदाज आहे. त्‍याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्‍या योगदानही महत्‍वपूर्ण आहे. मात्र मागील काही वर्ष त्‍याच्‍या गोलंदाजीतील धार कमी होत आहे. त्‍यामुळेच आयपीएलमध्‍येही त्‍याच्‍या प्रभाव दिसलेला नाही.

भुवनेश्‍वरच्‍या यॉर्करचा फार उपयोग होणार नाही

विश्‍वचषक स्‍पर्धेत याच्‍या यॉर्कर आणि संथ गोलंदाजही याचा फार उपयोग होणार नाही. भुवनेश्‍वर यांच्‍या जागी चाहर हा प्रभावी कामगिरी करु शकतो, असे सुनील गावस्‍कर यांनी स्‍पष्‍ट केले आहे. चाहर याने नोव्‍हेंबर २०२१मध्‍ये न्‍यूझीलंडविरुद्‍धच्‍या मालिकेत अष्‍टपैलू कामगिरी केली आहे. तसेच श्रीलंकविरुदधच्‍या एक दिवसीय मालिकेतही त्‍याने उत्‍कृष्‍ट फलंदाजी केली होती, असेही गावस्‍कर म्‍हणाले. विश्‍वचषक स्‍पर्धेला अद्‍याप १७ ते १८ महिन्‍यांचा कालावधी आहे. भारताने संघ निश्‍चित करुन विश्‍वचषक स्‍पर्धेची तयार सुरु करावी, अशी अपेक्षाही त्‍यांनी केली आहे.

Back to top button