Bill Gates : संशोधन आणि विकासावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते | पुढारी

Bill Gates : संशोधन आणि विकासावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते

वॉशिंग्टन ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहे. दरम्यान WHO च्या माहितीनुसार कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट अजूनही येण्याची शक्यता आहे. दरम्यान जगातील श्रीमंत व्यक्तींमधील एक असलेले बिल गेट्स यांनी कोरोना पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. भविष्यात कोरोनापेक्षाही भीषण महामारीला आपल्याला सामोरे जावे लागेल असे गेट्स म्हणाले. (Bill Gates)

बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशनच्यावतीने कोएलिशन फॉर एपेडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशनला (सीईपीआय) १५० मिलियन डॉलरची रक्कम दान केली. यावेळी त्यांनी भविष्यातील स्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. जगाची वेगवान वाढ होत आहे; पण विषाणुंशी मुकाबलाही जगाला करावा लागत असल्याचे गेट्स म्हणाले.

Bill Gates : भविष्यात कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती

भविष्यात कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जगातील देशांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. संशोधन आणि विकास यांच्यावर केली जाणारी गुंतवणूक आपले आयुष्य वाचवू शकते हे आपण गेल्या २० वर्षांत पाहिले आहे. काही संभाव्य महामारीत मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा अधिक असू शकते, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.

देशातील कोरोनाचा वाढताच

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३ लाख ३७ हजार ७०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ९,५५० ने कमी आहे. दिवसभरात २ लाख ४२ हजार ६७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या देशात कोरोनाचे २१ लाख १३ हजार ३६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १७.२२ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या १०,०५० वर गेली आहे. ओमायक्रॉन रुग्णसंख्येत ३.६९ टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button