Naga Chaitanya : साऊथ स्टारचा ओटीटीवर डेब्यू, वेबसीरीजमधून झळकणार

naga chaitanya
naga chaitanya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगु अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. ही माहिती स्वत: नागा चैतन्यने इन्स्टाग्रामवर दिली आहे. मंगळवारी, १ मार्चला त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीय की त्याने वेबसीरीज डुथाचे शूटिंग सुरू केले आहे.(Naga Chaitanya)

नागा चैतन्यने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया अकाऊंटवर वेबसीरीजचा एक फोटो अपलोड केलाय. टू ए न्यू स्टार्ट अशीही कॅप्शन त्य़ाने या फोटोला दिलीय. ही एक सुपरनॅच्युरल थ्रीलर वेबसीरीज असेल. स्क्रिप्टच्या पहिल्या पानावर डब्ल्यूएच ऑडेन (W.H Auden)च्या कोटसह मालिकेचे नाव लिहिले होते. त्यात म्हटलंय- "मला आणि जनतेला माहित आहे की सर्व शाळकरी मुले काय शिकतात, ज्यांच्याशी वाईट केले जाते ते बदल्यात वाईट करतात.

फोटोमध्ये स्क्रिप्ट लॅपटॉपच्या की-बोर्डवर दिसते. या मालिकेत नागा चैतन्य एक सीन प्ले करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

एका वेबसाईटच्या माहितीनुसार 'डूथा' चे दिग्दर्शन विक्रम कुमार करत आहेत. त्यांनी चैतन्यचा आगामी चित्रपट 'थँक यू' देखील दिग्दर्शित केला आहे. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर याबद्दल विचारताना दिसतात. पण, या चित्रपटाचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत.

यावर्षी जानेवारीमध्ये त्याने वडील नागार्जुन यांच्यासोबत तेलुगू चित्रपट केला होता. 'बंगराजू'मध्ये हा अभिनेता शेवटी रुपेरी पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या 'सोग्गडे चिन्नी नयना' या सिनेमाचा सिक्वेल होता.

नागाचैतन्य बॉलिवूडमध्येही येण्यास सज्ज झालाय. तो आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लाल सिंह चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पचा रिमेक असेल. आमिर खानसोबत चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत असेल. त्याचा थँक्यू हा नवा चित्रपट येतोय, यामध्ये साऊथ अभिनेत्री राशि खन्ना मुख्य भूमिकेत असेल.

कोटींच्या संपत्तीचा मालक आहे नागा चैतन्य

सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य १५४ कोटी संपत्तीचा मालक आहे. नागा चैतन्य चित्रपटांबरोबरचं ब्रँड एंडोर्समेंटने मोठी कमाई करतो. नागा चैतन्यची वर्षाची कमाई २५ कोटी रुपयांपर्यंत आहे. नागा चैतन्यजवळ एक शानदार कार आणि बाईक कलेक्शनदेखील आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात महागडी बाईक Yamaha YZF-R1 आणि त्रिउम्फ थ्रो स्टोन आर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news